सात वर्षापासून रोकले कारागिर वर्क शेडचे अनुदान
* सूत कताई , विनकाम कारागिरात असंतोष *
* सावलीतील खादी कारागिरांची व्यथा *
*अनुदान त्वरित मिळविण्याची केली मागणी *
सावली ( लोकमत दुधे )
सुत कताई आणि विनाई कारागिराना काम करन्यासाठी निर्माण करन्यात आलेल्या वयक्तिक कारागिर वर्क शेड चे अनुदान गेली साहा ते सात वर्षा पासून रोकुन धरल्याने सुत कताई आणि विनकाम करना ऱ्या कारागिरात असंतोष निर्माण झाला आहे कारागिर शेड साठी निर्माण करन्यात आलेल्या सदर योजनेचे अनुदान मिळत नसल्याने अनेक वर्क शेड बांधकाम साहित्या विना अधुरे तर काही बांधकाम पूर्ण झाले असून अनुदानासाठी चरखा संघ कार्यालयात हेलपाट्या मारण्याची वेळ कारागिरावर निर्माण झाली आहे मात्र सावली आणि मूल कार्यालयातून कारागिरांचे उर्वारित फायनल वर्क शेड चे कागदपत्र नागपुर खादी ग्रामोद्योग आयोगाकडे पाठविल्याचे व्यवसथापक मंडळ सावली कडून सांगितले जात आहे सावली येथिल नाग विदर्भ चरखा संघ मूल द्वारा संचालित खादी कार्यालयाची निर्मिति करन्यात आली या माध्यमातून सुतकताई आणि विनकाम केले जाते त्यातून खादी धोतराची निर्मिति केलि जात होती त्यामुळे सावली येथील खादीचे धोतर संबंध देशात प्रशिद्ध होता कारागिरांच्या या मेहनत आणि कलेवर सस्थेने आतापर्यंत अनेक पारितोषिक पटकविले या कामात आजतागायत अनेक सुत कताई आणि विनकाम करना ऱ्या कारागिरांचा सुधा सन्मान करन्यात आला कारागिरांची ही मेहनत आणि कलाकुसर पाहुन कारागिराना काम करण्यासाठी उत्तम सोय निर्माण व्हावी म्हणून सन २०१४- १५ मधे वयक्तिक कारागिर वर्क शेडचि योजना खादी ग्रामोद्योग आयोग (के वाय सी) लघु मंत्रालयाच्या माध्यमातून कार्यान्वित करन्यात आली त्यावेळी कारागिर वर्क शेड साठी ४५, ००० /- रु अनुदान निश्चित करन्यात आले होते मात्र बांधकाम साहित्याची भरमार वाढलेली कीमत लक्षात घेता सदर अनुदान ४५, ००० /- रु वरुण सन २०१५-१६ या कालावधीत त्यात वाढ करुण ६०,००० /- रु पर्यन्त कन्यात आले ४५,०००/- रु अनुदानाच्या काळात ३३ कारागिराना वर्क शेड मंजूर करन्यात आले तर ६०,०००/- रु मधे १० असे एकंदरीत ४३ सुत कताई आणि विनकाम करना ऱ्या कारागिराना वर्क शेड मंजूर करन्यात आले मात्र साहा ते सात वर्षाचा कालावधि लोटूनही उर्वारित काही करागिरांचे अनुदान रोकून धरल्याने कारागिरात कमालिचा असंतोष निर्माण झाला आहे सन १९५८ मधे नाग विदर्भ चरखा संघाच्या माध्यमातून खादी कार्यालयाची निर्मिति झाल्यापासुन सावली येथे आजतागायत या संघात सुत कताई आणि विनकाम केले जात आहे त्यामुळे या कामातुन अनेक गरीब कुटुंबाचा प्रपंच भागविला जात आहे एके काळी कारगिरानी गजबजलेल्या या ठिकाणी कारागिरांच्या संखेत आजच्या घडीला कमाली ची कमतरता जानविली जात आहे त्यात योग्य मोबादला , आरोग्याच्या सोई आदिंचा मोठा अभाव असल्याचे कारागिरांकडून सांगितले जात आहे त्यामुळे आजच्या घडीला बोटावर मोजन्या इतके सुत कताई , आनी विनकाम करनारे कारागिर चरखा संघात काम करताना दिसुन येत आहेत सुर्वातिपासुनच सावली सारख्या ग्रामीण भागात ही सुतकताई आणि विनकामाचे पवित्र काम सुरु होते या कामाची भनक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना लागताच सदर कामाची पाहणी आणि आठवड़ा भराच्या मुक्कामाने महात्मा गांधी आनी त्यांच्या समवेत अनेक स्वातंत्र सेनानी आठवड़ा भर सावली चरखा संघ कार्यालयात मुक्काम केला या आठवड़ा त्यांचे मानस पुत्र कृष्णादास गांधी यांचा विवाह सुधा सावली येथील चरखा संघ कार्यालयात करन्यात आला सोबतच सावलीतुनच स्वातंत्र लढ़याचे रनसिंगे फुंकन्यात आल्याचे सांगितले जात आहे ऐवढी महती सावली येथील नाग विदर्भ चरखा संघाची आणि त्यात काम करना ऱ्या कारागिरांची असताना आजही येथील सुत कताई आणि विनकाम करणारे कारागिर उपेक्षित असल्याचे दिसुन येत आहे खादी कार्यालयातील अनेक जुन्या ईमारती पळून जमींदोस्त झाल्या जुने धुलाई , रंगाई , चर्मकार विभाग बंद झाले केवळ सुत कताई आणि विनकाम या पलीकडे यातील अनेक विभाग बंद असून बदलत्या परिस्थितीत सुत कताई चरख्यासह विनकाम करना ऱ्या हात माँगट्यात मोठा बदल झाला असला तरी कारागिर मिळेनासे झाल्याचे दिसुन येत आहे याकडे मात्र कुण्या लोकप्रतिनिधि किवा खादी ग्रामोद्योग विभागाचे दुर्लक्ष होताना दिसते तेव्हा आजतागायत सुरु असलेले सुत कताई आणि विनकाम भविष्यात बंद होणार की क़ाय अशी शंका वर्तविली जात आहे तेव्हा सुत कताई आणि विनकाम करना ऱ्या कारागिरांचे रोकलेले वर्क शेडचे उर्वरित अनुदान त्वरित देण्याचे करावे अशी मागणी सुत कताई , विनाई कारागिरांकड़ू केलि जात असली तरी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष , कामात मिळणारा मोबदला , कारागिरांची दिवसागनिक होणारी कमतरता ,आदि कारणास्त्व सावली येथे नाग विदर्भ चरखा संघाच्या माध्यमातून सुरु असलेले सुत कताई , विनकाम धोक्याची घंटा देणारे ठरत आहे…..
………………………………
सावली , मूल कार्यालयातून कारागिरांच्या वर्क शेड अनुदान संबंधी सर्व फायनल सर्टिफिकेट नागपुर खादी आयोगाकडे पाठविले आहे …नवीन पीढ़ी आणि लोकांची मानसिकता आता खादी कामाकडे राहिली नसल्याने कामगारांची संख्या कमी होताना दिसते कारागिरांची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न केले जात आहे …
* बालू पवार *
व्यवसथापक नाग विदर्भ चरखा संघ खादी कार्यालय सावली
……………………………



