Vidarbh24News

Latest Online Breaking News

*गटसाधन केंद्र, सावली अंतर्गत जनभागीदारी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी.*

सावली:प्रा.शेखर प्यारमवारव

‘वसुधैव कुटुम्ब़कम ’ या भारतीय तत्वज्ञानावर आधारित G 20 summit दि. १९ जून ते २२ जून २०२३ या दरम्यान पुणे येथे होणार आहे. त्यासाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान हा विषय केंद्रस्थानी आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मिशन मोडमध्ये २०२६-२७ पर्यंत प्रत्येक बालकाला साध्य़ करणे, याची सुनिश्चिती करावयाची आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हयात वाडी, वस्ती, तांडा, पाडया वरील प्रत्येक बालकास पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विहीत मुदतीत साध्य़ करून दयावयाचे असल्याने गुणवत्तापूर्ण पायाभूत शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होणे आवश्य़क आहे त्यासाठी जनचळवळ होण्याची गरज आहे.

या हेतूने मा. राजकुमार हिवारे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर, मा. दिपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी, जि.प. चंद्रपूर, मा. धनंजय चापले, वरिष्ठ़ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर, मा. विनोद लवांडे, अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर यांच्या प्रेरणेतून व मा. लोकेश खंडाळे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, सावली यांच्या मार्गदर्शनाखली चंद्रपूर जिल्हांतर्गत गटसाधन केंद्र सावली मार्फत ‘जनभागीदारी उपक्रम़’ सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये व गावतपातळीवर १ जून ते १५ जून, सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत या कालावधीत अतिशय प्रभावीपणे राबविण्यात आला.यामध्ये गावातील नागरिक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य़ गण, अंगणवाडी कार्यकर्ती, मॅजिक बस कार्यकर्ते, मुख्याध्यापक, शिक्षक, विदयार्थी तसेच पर्यवेक्षकीय यंत्रणेतील कर्मचारी सक्रिय सहभागी झाले होते. यामध्ये SCERT मार्फत दिलेल्या नियोजनानूसार दरदिवशी विविध कार्यक्रम उत्स्फुर्त व सकारात्मकतेने व उत्साहाने घेण्यात आले. या उपक्रमाकरिता पंचायत समिती सावली अंतर्गत शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, सर्व साधनव्यक्ती, अपंग समावेशित शिक्षण तज्ञ व विशेष शिक्षक यांनी सहकार्य केले.

(विशेष बाब)-महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, महाराष्ट्र शासन यांच्या सोशन मिडिया हॅन्ड़ल वरून व्टिटर, फेसबुक, इन्स्टाग्राम व यु-टयूब वर पंचायत समिती सावली अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोखाळा या शाळेतील उपक्रमाच्या व्हिडीओची शाळेच्या नावासह दखल घेण्यात आली तसेच काही शाळातील व्हिडीओंचा सुध्दा समावेश करण्यात आला आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!