शेतकऱ्याचा मुलगा बनला एमबीबीएस डॉक्टर
डॉक्टर बनायचं म्हटल की, आपल्यापुढें पैसाचा विचार येतो. श्रीमंत आईवडीलांचीच मुले एमबीबीएस होऊ शकतात असा आपला समज आहे परंतु एक शेतकऱ्याचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो आणि तेही ग्रामीण भागांतील. हे सिद्ध केलं चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यातील नवेगाव भूजला या छोट्याशा गावातील अक्षय माहोरकरने. आजकाल स्पर्धेमध्ये टिकून राहणं कठीण झालं आहे. एक सरकारी नोकरी मिळविन्यासाठी किती खटाटोप करावा लागतो हे आपल्याला माहित आहेच. हल्ली स्पर्धेचं युग वाढत चाललं आहे, आणि खेड्यातल्या मुलांना तर जास्त कष्ट करावा लागतो, अश्या या युगात चक्क एम.बी.बी.एस ची डिग्री घेऊन नवेगाव भुज येथील डॉ. अक्षय रुखमागंध माहोरकर यांनी डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केल आहे.
डॉ.अक्षय चे बालपण मूल तालुक्यातील नवेगावं भुजला इथे गेलं, इय्यता सातवी पर्यन्त शिक्षण जि. प. उच्छ प्राथमिक शाळा नवेगाव
भुजला, मराठी माध्यमातून पूर्ण केलं. कि घरची परिस्थिती हलाकीचीच,आई ‘शिलाबाई माहोरकर आणि बाबा रुखमागंध माहोरकर व पाच भावंड असा मोठा परिवार त्यात अक्षय सर्वात लहान उपजीविकेच साधन म्हणजे फक्त शेती. त्यात सगळ्याचं शिक्षण म्हटलं माहोरकर याने गावातून बाहेर निघून खर्च वाढेलच. अशा परिस्थितीमध्ये घरचे खचले नाहीत नंतर त्याचा मोठा भाऊ आशिष जिल्हयाच्या ठिकाणी शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला व तिथेच राहून अक्षयला आपल्याकडे बोलावून घेतले. एक मराठी मुलगा, जुबिली हायस्कूल, चंद्रपूर मध्ये शिकायला आला आणि राहण्यासाठी मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चंद्रपूर इथे अॅडमिशन घेतलं. पहील्याच वर्षी वर्गातून प्रथम क्रमांक पटकावीला आणि अक्षय चा खरा प्रवास सुरु झाला. त्यानंतर अकरावी बारावी सायन्स साठी भवानजिभाई चव्हाण, ज्युनिअर कॉलेज मध्ये अॅडमिशन घेतले आणि या कॉलेजमधे शिक्षकांकडून व मित्रपरिवार कडून माहिती घेऊन डॉक्टर व्हायचं असे ठरविले. नंतर नीट या मेडिकल प्रवेश परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे नंबर लागला आणि तब्बल साडे पाच वर्ष एम बी बी एस करायला लागले.
अभ्यास करून आज अक्षयचा डॉक्टर अक्षय झाला. सध्या अक्षय जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर इथे कार्यरत आहे. गावाकडची ची रुग्ण आली कि नेहमी मदतीला तत्पर असतो. आज त्याला डॉक्टर म्हणून मदत करण्यास आनंद वाटतो आहे. डॉ. अक्षय आपल्या प्रवासात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांना गुरु मानले. आणि असेच समोर चे शिक्षण जिद्दीने घ्यायला तयारी करीत आहे.
गावातल्या मुलांनी नक्कीच स्वप्न मोठे बघावेत आणि ते साध्य करण्यासाठी आई बाबांचे चेहरे डोळ्यासमोर ठेऊन अभ्यास करावा, असे डॉ. अक्षय म्हणाला.



