पिएम किसान योजनेची ई-केवायसी करण्याचें आव्हाहन
जिल्हयात 33,309 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित
ई-केवायसी केल्या शिवाय चौदावा हप्ता मिळणार नाही
पिएम सन्मान निधी योजनेची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व बँक खात्याला आधार जोडणी पूर्ण केली असणे आवश्यक आहे. ई-केवायसी तथा बँक खात्याला आधार जोडणी प्रक्रिया पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधीचा 14 हप्ता व पुढील हप्ते तसेच राज्य शासनाच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ या दोन्ही योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सध्या एकंदरीत 33,309 शेतकऱ्यांचे ई-केवायसी करणे प्रलंबित आहे. ई-केवायसी त्वरीत करीत न केल्यास शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018 पासून सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत म्हणून देण्यात येते. पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत केली
जात असून आतापर्यंत सदर योजनेच्या 13 हप्त्यांचे प्रदान करण्यात आले आहे. तसेच सदर योजनेच्या 14 व्या हप्त्याचे वितरण जून 2023 मध्ये करण्यात येणार आहे. मात्र ई-केवायसी पूर्ण झाली नसल्यास संबंधित लाभार्थी शेतकऱ्याला 14 व्या हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्वरित ई- केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे चेहरा प्रमाणीकरणाच्या माध्यमातून आता ई-केवायसी करता येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त लाभ म्हणून ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना सुरू करण्यास कॅबीनेट मध्ये मंजुरी मिळाली आहे. पीएम. किसान निधी मधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र शासनातर्फे वर्षाला अतिरीक्त सहा हजार रुपये जमा करण्यात येईल. त्यामुळे महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केंद्र शासनातर्फे वार्षिक सहा हजार व राज्य शासनातर्फे वार्षिक सहा असे एकंदरीत वर्षाला 12 हजार रुपयांची आर्थिक मदत जमा केली केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील जाणार आहे. जिल्ह्यात सध्या एकंदरीत प्रलंबित आहेत.
33,309 शेतकऱ्यांची ई-केवायस करणे प्रलंबित आहे, यात चिमूर तालुक्यात सर्वाधिक प्रलंबित प्रकर आहेत बल्लारपूर तालुक्यात 555 भद्रावती- 2012, ब्रम्हपूरी 3430 -5973 गोंडपिपरी-1306, जिवती – 1236 कोरपना -1693, मूल -2634 नागभीड 2698, पोंभूर्णा- 1251 राजूरा 2098 सावली -2591 सिंदेवाही- 2114, आणि वरोरा तालुक्या 3009, शेतकऱ्यांचे ई-केवायसी व्हायची आहे.
कशी करावी ई-केवायसी
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील ई- केवायसी झालेली नसलेल्या शेतकऱ्यांची यादी गावातील कृषी सहाय्यक यांचेकडे तथा ग्राम पंचायत स्तरावर उपलब्ध असून सदर योजनेच्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी झाली नसल्यास कृषी विभागाचे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच, आपले नोंदणीची स्थिती जाणून घेणेकरीता पुढील प्रणालीचा वापर करावा. पी. एम. किसान पोर्टलवरील फार्मर कॉर्नर मधील ई-केवायसी ओटीपी आधारीत सुविधेद्वारे केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे किंवा नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन करावी.



