Vidarbh24News

Latest Online Breaking News

गोसी खुर्दच्या भूमिगत जलवाहिनी कामात दिरंगाई

 भूमिगत जलवाहिनिमुळे जुने लघुकालवे संपुष्टत *
* मशागतीची कामे अडल्याने शेतकरी चिंतातूर *
सावली( लोकमत दुधे )
गोसे राष्ट्रीय पकल्पा अंतर्गत ब्रिटिश कालीन आसोलामेंढा तलावाचे नुतानिकरण सोभातच मुख्य नाहराचे दुथळी सिमेंट कांक्रीट आणि उप कालवे कालबाह्य करुण त्याऐवजी भूमिगत जलवाहीनी टाकून शेतक ऱ्यांच्या बाँधापर्यंत पाण्याचा अपवय न होता वॉल द्वारे पानी पोहचविन्याचा हेतु शासनाचा असताना तालुक्यात अनेक भागातील भूमिगत जलवाहिनीचे काम अधूरे तर काही ठिकाणी केवळ खोदकाम करू ठेवल्याचे शेतकरी बाधवांकड़ूँ सांगितले जात आहे त्यामुळे भूमिगत जलवाहिच्या कामात मोठ्या प्रमाणात दिरांगाई दिसुन येत आहे उन्हाळा संपुन शेती हगामाला सुरुवात होत असताना जलवाहीनीचे काम अधूरे दिसत नसल्याने त्यांचा नाहक त्रास शेतक ऱ्यांना चालू हंगात सहन करावा लागण्याचे चित्र निर्माण होत आहे अशीच भूमिगत जलवाहिनिच्या कामात दिरांगाई सुरु असल्याचि ओरङ तालुक्यातील खेड़ी येथील शेतक ऱ्यानी केलि असून सदर कामाचा फटका चालू हंगामात होण्याची शक्यता शेतक़ऱ्याकडून वर्तविली जात आहे गोसीखुर्दचे पाणी वाया न जाता थेट शेतात पिकांना मिळावे यासाठी बंदनलिकाद्वारे पाणी देण्याचा नियोजन आहे . मात्र खेडी शेतशिवारात जानेवारी महिन्यापासून खोदकाम करून ठेवण्यात येऊन पाईप न टाकल्याने मशागतीची कामे अडली आहेत त्यामुळे ऐन खरीप हंगामाच्या काळात शेतात जाता येत नाही , मशागतीची कामे अडून असल्याने शेतकरी चिंतातूर आहे.
सावली तालुक्यात खेडी शेतशिवारात मागील जानेवारी फरवरी महिन्यात बंद नलिकेद्वारे पाणी खरीप पिकाला देणार असल्याचे सांगून खोदकाम केले . सदर खोदकाम ५ फुट खोलीचे असून १७ किलोमिटर लांबीचे खोदण्यात आले. मात्र पूर्ण उन्हाळा गेला असतांना पाईप टाकलेले नाही. परिणामी खरीप हंगामाला सुरवात झालेली असतांना शेतात जाता येत नाही , पूर्व मशागत करता येत नाही. त्यामुळे यावर्षी पिक कसा घेणार या चिंतेत शेतकरी आहे असे पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार यांनी सांगितले.
*माजी मंत्री वडेट्टीवार यांनी केली कान उघाडणी!*
गोसीखुर्द प्रकल्पाच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी व्याहाड खुर्द येथे नुकतीच अधिकारी शेतकरी यांची जनसभा घेण्यात आली . या सभेत प्रश्न येताच अधिकाऱ्यांना धारेवर धरत चांगलीच कान उघाडणी केली. ताबडतोब ही कामे करायला लावा अन्यथा संबंधित ठेकेदारावर कारवाई करा असे निर्देश दिले. आठ दिवसात कामे होतील असा विश्वास यावेळी अधिकाऱ्यांनी दिला. मात्र पाईपच उपलब्ध नसल्याने कामे पूर्ण करणार की आमदारांच्या समाधानीसाठी उत्तर दिले ? अशी चर्चा शेतकऱ्यांत आहे.
*खरीप हंगामाला पाणी मिळणार का?*
खरीप हंगामाला पाणी देण्याच्या उद्देशाने मुख्य मायनरपासुन पाईप लाईन टाकण्यात आली पण इकडे टेलपर्यंत पाईप टाकण्याचे काम अपूर्ण असल्याने पिकाला पाणी कसे मिळणार असा यक्ष प्रश्न शेतकऱ्याना पडला आहे …..

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!