नागभीड नागपूर रोडवर कार ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात 4 ठार, 2 गंभीर
आज रविवारी दुपारी 4 वाजता नागपूर वरून नागभीड च्या दिशेने येणाऱ्या कारची समोरून येणाऱ्या एआरबी ट्रॅव्हल्सला समोर धडक दिली.
या भीषण अपघातात कारमध्ये बसलेल्या चार व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. तर यामध्ये एक महिला व एक मुलगी असे दोन जन गंभीर जखमी झाले आहेत. कारमधील एकूण सहापैकी चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला व एक मुलगी गंभीर जखमी आहे.त्यांना उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहे. मृत दोन महिला व दोन पुरुष कारमध्ये फसून आहेत. घटनास्थळी नागभीड पोलीस ठाण्याचे अधिकारी पोहोचले आहेत. कार कापून मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे.
घटनास्थळ गाठून नागभीड पोलीस दुर्घटनेचा तपास करीत आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे नाव कळू शकले नाही. पुढील तपास नागभिड पोलीस करीत आहेत.