पोलिस पाटील भरती प्रक्रिया आजपासुन सूरू
चंद्रपुर जिल्ह्यातील मुल उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील (मुल- सावली तालुक्यातील) गावात पोलीस पाटील पद भरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडुन विहीत नमुन्यात
फक्त ऑफ लाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
परीक्षेकरीता ऑफलाईन अर्ज भरण्याचा कालावधी 01 जुन 2023 से 15 जून, 2023 कार्यालयीन दिवशी आणि 11.00 ते 05.00 या कालावधीील प्राप्त होईल.


परिक्षा शुल्क ऑफ लाईन पध्दतीने भरावे लागेल, खुला प्रवर्ग रुपये 500/- आरक्षीत / आर्थीक दुर्बल घटक प्रवर्गासाठी रुपये 300/-
सरळसेवा भरती प्रक्रियेची सविस्तर जाहीरात उपविभागीय अधिकारी कार्यालय, मूल, तहसिल कार्यालय, सावली / मूल ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. अर्जदाराने संपुर्ण जाहिरनामातील प्रक्रिया काळजीपुर्वक समजुन घेवून ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत. विहीत ऑफ लाईन पध्दतीने भरलेला अर्ज ग्राहय धरण्यात येईल. भरती प्रक्रीयेच्या अद्यावत माहीतीबाबत सुचना उपविभागीय अधिकारी कार्यालय, मूल, तहसिल कार्यालय, सावली / मूल येथे प्रसिध्द करण्यात येतील. तरी जागृत राहण्याची जबाबदारी संपुर्णतः अर्जदाराची राहील.
पोलीस पाटील पदाकरिता किमान आवश्यक अर्हता :-
1. अर्जदार हा दहावी परिक्षा (एस.एस.सी) पास असावा.
2. अ) वयोमर्यादे करीता अर्जदाराचे दिनांक 29/05/2023 रोजीचे वय विचारात घेतले जाईल.
ब) अर्जदाराचे वय दिनांक 29/05/2023 रोजी 25 वर्षापेक्षा कमी नसावे व 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.
क) पोलीस पाटील पदाकरीता वयोमर्यादा शिथीलक्षम नाही.
3. अर्जदार हा स्थानिक रहिवासी असावा. अर्जदाराने राशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, आधारकार्ड व ज्या पुराव्याने स्थानिक रहिवासी असल्याचे शिध्द होते. असा कोणताही एक पुरावा मुलाखतीच्या वेळी सादर करावा.
4. अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा मोबाईल नंबर नमुद करावा.
5. अर्जदार शारीरीक दृष्टया सक्षम असावा व अर्जदाराचे चरित्र निष्कलंक असणे आवश्यक आहे.
6. महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटूंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 मधील लहान कुटूंबाची अर्हता धारण करणे अर्जदारास आवश्यक राहील. (अर्जदार याची अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत)
7. मागास प्रर्वगासाठी आरक्षित पदाकरीता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र तसेच आर्थिक दुर्बल घटकाकरीता सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले EWS प्रमाणपत्र आवश्यक राहिल.
8. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, वि.जा. अ. तसेच भ.ज.ब.क. या प्रवर्गातील अर्जदार यांना सन 2022-23 या कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती गट (क्रिमिलेअर) यामध्ये मोडत असल्याबाबतचे (नॉन क्रिमिलेअर) प्रमाणपत्र आवश्यक राहील.
परिक्षा 100 गुणांची असेल यापैकी 80 गुण लेखी परीक्षेचे तर 20 गुण तोंडी परीक्षेचे असतील.
पोलस पाटील भरतीबाबत अर्ज उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, मुल येथून ऑफ लाईन पद्धतीचा प्राप्त करू घ्यावे. कार्यालयीन दिवसी दररोज सकाळी 11.00 ते 05.00 या कालावधीत उपलब्ध होईल.



