*निलिमा बोलीवार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित*
गडचिरोली: तालुक्यातील डोंगरगाव येथील निलिमा बोलीवार याना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.भारत सरकार अंतर्गत राज्यातील ग्रामपंचायत यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. निलिमा बोलीवार या समाजातील महिलांना एकत्रित करून महिला सक्षमीकरण व समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतात, विशेष म्हणजे गावातील दारुबंदीसाठी पुढाकार घेऊन त्यासाठी सतत कार्यरत आहेत, गावातील तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष म्हणून छान कामगिरी बजावली आहे..तसेच विविध सामाजिक व शासकीय उपक्रम राबविण्यात नेहमीच पुढे येवून मोलाचे योगदान देत असतात,

सध्या ग्रामसंघ महिला अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत आणि अ.भा.मादगी समाज संघठना म.रा. मध्ये महिला संघठिका म्हणून काम करतात. अशा विविध सामाजिक कार्याची दखल घेऊन ३१ मे रोजी डोंगरगाव ग्रामपंचायत येथे रुपाली पापडकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल पती देविदास बोलीवार, मोहनभाऊ देवतळे, संगरक्षित बांबोळे, अनिल बोटकावार,धम्मराव तानादु, एल.मोहुर्ले, विजय देवतळे व गावातील व्यक्तीकडून कौतुक केल्या जात आहे



