रुदय सामाजिक संस्था करणार ५० गावे बालविवाह मुक्त – काशिनाथ देवगडे
रुरल ॲन्ड अर्बन डेव्हल्पमेंट युथ असोशिएशन (रुदय) गडचिरोली ही १९९२ पासून गडचिरोली सारख्या आदिवासी व मागास जिल्हात विविध प्रकल्पाच्या माध्यमातून सामाजिक विकासाचे कार्य करीत आहे. या संस्थेला बालकल्याण क्षेत्रात काम करण्याचा प्रदिर्घ अनुभव आहे, याच अनुभवाच्या शिदोरीवर नुकताच “असेस टू जस्टीस” हा प्रकल्प चंद्रपुर जिल्ह्यात राबविण्यासाठी कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन्स फॉन्डेशन अमेरिका सोबत दिल्ली येथे दिनांक ०५/०५/२०२३ रोजी सामंजश्य करार करण्यात आला,

कैलास सत्यार्थी फॉन्डेशन ही बालकांच्या क्षेत्रातील काम करणारी जागतिक संस्था असून १९८० पासून एक लाख लहान बालकांना संकटातून सोडवून त्यांचे पुर्ववसन केले आहे. अशा संस्थेसोबत काम करण्याची संधी मिळने हे आमचे सौभाग्य आहे. असे काशिनाथ देवगडे कार्यकारी संस्थापक, रुदय संस्था गडचिरोली यांनी जिल्हा बाल संरक्षण कक्ष-चंद्रपुर येथे दिनांक २५/०५/२०२३ रोजी आयोजीत केलेल्या “बालविवाह प्रतिबंध” अभियानाच्या कार्यक्रमात व्यक्त केले, व बालविवाह प्रतिबंध अधिनीयम २००६, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनीय २०१२, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनीयम २०१५ मधील महत्वाच्या कलमांची माहिती करुण दिली, तथा पुढील १० महिन्यात चंद्रपुर जिल्ह्यातील ५० गावे बाल विवाह मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला असून ७५००० लोकांकडून बाल विवाह प्रतिबंधासाठी प्रतिज्ञा पत्र भरुण घेण्यात येणार आहे. त्याच बरोबर बाल मजूरी, बाल तस्करी, बाल लैंगिक अत्याचार या विषयावर सुध्दा काम करणार असल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमात अजय साखरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चंद्रपुर यांनी बाल विवाह प्रतिबंध अधिकाऱ्याची भूमिका यावर मार्गदर्शन केले तर अनिल तानले विधी सल्लागार, कविता राठोड, संरक्षण अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी बाल विवाह करणार नाही वा बाल विवाहात सहभागी होणार नसल्याची शपत घेण्यात आली. सदर कार्यक्रमात जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, तथा रुदय संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आनंदराव मोहुर्ले, प्रकल्प व्यवस्थापक, यांनी केले, ॲङ विद्या मोरे , क्षेत्र अधिकारी यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.



