*…..अखेर वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाला आले यश !*
* आठवडा भरात बिबट्यासह दोन बछडे व एक नरभक्षी वाघीण जेरबंद+
जेरबंद वाघाला बघण्यासाठी मोठी तोबा गर्दी *
* १०० वन कर्मचारी ;४ शूटर ,५ पिंजरे ; ५० कॉमेरे होते तैनात *
*सावली ( लोकमत दुधे/बाबा मेश्राम)*
सावली वनपरिक्षेत्रात येत असलेल्या उपवन क्षेत्र व्याहाड खुर्द बिट सामदा अंतर्गत येणाऱ्या वाघोली बुट्टी आणि वैनगंगा नदी लगत दोन महिलांना ठार करणारी वाघीण अखेर जेरबंद झाली असुन.वनविभागाला मोठे यश.आल्याचे दिसून येत आहे, सदर नरभक्षी वाघीनेने उपक्षेत्र व्याहाड खुर्द अंतर्गत सामदा बिटातील.वाघोली येथील ममता बोदलकर(६५) आणि प्रेमिला रोहनकर.(५७)या एकाच गावातील दोन महिलांना काही दिवसांच्या अंतराने शेतात काम करीत असताना त्यामुळे सदर उपवनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बिटामध्ये मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते,या भागातील नरभक्षी वाघाला त्वरीत जेरबंद करण्यात यावे,अशी भूमिका या गावाक-यांनी घेतली होती ,दरम्यानच्या काळात खवळलेल्या गावाक-यांनी वनकर्मचारी सोबत तु तु मै मैं असाही प्रकार घडला,घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या भागात असणाऱ्या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे शर्तीचे प्रयत्न केले, त्यासाठी १०० वनकर्मचारी,५०कॉमेरे,५पिंजरे,४शुटर असा आर आर यु,आर आर टी अशी चंद्रपूर ची मोठी रेस्क्युची टिम या भागात नरभक्षी वाघाच्या मार्गावर होती,आठवडाभराच्या शोधमोहीमे नंतर आज रोजी(२७ मे) एक वाजताच्या दरम्यान वाघोली बुट्टी परिसरातील दोन.महिलांना ठार करणाऱ्या वाघीणीला.अखेर जेरबंद करण्यात. वनविभागाला यश आले….
सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या उपवन क्षेत्र व्याहाड खुर्द ,सामदा बिटातील वैनगंगा नदी लगत ममता हरिश्चंद्र बोदलकर(६५),रा वाघोली बुट्टी, हि महिला स्वतः च्या शेतातील मक्का आणि मिरचीची राखण करत असताना या भागात दबा धरून बसलेल्या वाघाने तिला ठार केले, तर या भागात जवळपास २४ दिवसांच्या अंतराने प्रेमिला मुखरु रोहनकर(५७) रा.वाघोली बुट्टी हिला. डॉ रुढे यांच्या फार्महाऊस मध्ये मक्का वाळवून शौचास जाताना या परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने ठार केले , एकाच महिन्यात चौविस दिवसांच्या अंतराने सलग दोन महिला वाघाच्या हलल्यात ठार झाल्याने सदर परीसरात वाघाच्या दहशतीचे मोठे वातावरण निर्माण झाले होते, सदर.भाग हा वैनंगंगा नदीलगत झुडपी जंगल.असुन यात वन्यजीवाचे वावर.आहे, अशी जनतेची ओरड असताना पाळीव प्राणीसह मनुष्य जीवांवर.वन्य हिंस्त्र पशुचे हल्ले. सातत्याने सुरू असताना दोन महिलांचा नाहक बळी गेला, त्यामुळे या भागातील नरभक्षी वाघाला जेरबंद किंवा शुट करण्याचे मोठे आवाहन जनतेच्या आक्रमक भुमिकेतुन वनविभागासमोर आवासुन उभे होते, याची गंभीर. दखल घेत वनविभागाने आपल्या ताफ्यासह आणि शेकडो वनकर्मचारी सह पिंजरा, कॉमेरे च्या माध्यमातून वनकर्मचा-यांना घटनेच्या ७ दिवसापासून हुलकावणी देणारा नरभक्षी वाघीण अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकली,..
वनपरिक्षेञ अंतर्गत असलेल्या पाथरी ,व्याहाड उपक्षेत्रात वाघासह बिबट्याने धुमाकुळ घालून जनजीवन भयभीत करीत दहशत निर्माण केली, या भागात अनेकांना गंभीर जखमीसह आपला जीव गमवावा लागला ,त्यामुळे या भागात भितीचे मोठे वातावरणात निर्माण झाले होते, या भागातील नरभक्षी हिंस्त्र पशुंना जेरबंद करण्यासाठी मोठे आवाहन वरिष्ठांसह वनकर्मचा-यासह होते, मात्र आज रोजी( २७) नरभक्षी वाघीणीला व्याहाड खुर्द.स्मशानभूमी परिसरालगत जेरबंद करण्यात आले, यापूर्वी वाघोली परीसरातील बिबट्यासह दोन बछडे जेरबंद करण्यात आले,
या कामात आर आर यु,आर आर टी, शुटर सह रेस्क्यू टिम सोबतच विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे, सहा.वनसंरक्षक शेंडगे, वनपरीक्षेत्र अधिकारी विरुटकर, अतिरिक्त वनपरिक्षेञ अधिकारी आर.डी.घोरुडे ,यांच्या सह उपवन व्याहाड क्षेत्र सहा.सुर्यवंशी, क्षेत्र सहा,सावली राजु कोडापे,तसेच टायगर वन्यजीव संरक्षक संस्थेचे नितिन पाल सह सर्ववनकर्मचा-,यांनी अथक परिश्रम घेतले,नरभक्षी जेरबंद झालेली वाघीण १७० वजनाची असून ३वर्षाची असल्याचे वनविभागाकडून सांगितले जात आहे,जेरबंद वाघीणीला टि.टि.सी चंद्रपूर ला स्थलांतरित करण्यात आले असून ,या वाघीणीला पाहण्या साठी सावली करांची मोठी तोबा गर्दी वनविभाग कार्यालय समोर दिसत होती…



