दुचाकीची सामोरा – समोर टक्कर एक ठार एक गंभिर

मिथुन श्रीगिरीवार वय ३० वर्षे हा आपल्या पोटाची खळगी भरणासाठी गडचिरोलीला दही विकण्यासाठी गेला होता. दही विकून आपल्या गावी परत येतांना नागोबा मंदीरासमोर आशिष बोरकर निलसणी पेटगाव वरुण व्याहाड बुजला जात असतांना दोघांची दुचाकी परस्पर विरुद्ध दिशेने आढळल्याने मिथुन श्रीगिरीवार यांचा दवाखान्यात भरती करीत असतांना मृत्यू झाला तर आशिष बोरकर गंभीर जखमी झाले त्यांना सामान्य रुग्णालय गडचिरोलीला पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले. मिथुन श्रीगिरीवार आणि आशिष बोरकर हे दोघेही निलसणी पेटगाव या एकाच गावचे रहिवासी आहेत.
मिथुन श्रीगिरीवार घरातील एकुलता कमावता व्यक्ति असल्याने त्याच्या कुटुंबावर संकट ओढवले आहे. त्याच्या पश्चात पत्नी व दोन लहान लहान मुले आहेत. मिथुनच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.