अकोला दंगलीमागील मास्टरमाइंड अरबाज खान गजाआड

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुपरफास्ट ऍक्शन!
आठवडाभरापूर्वी अकोल्यात घडविल्या गेलेल्या दंगलीमागील प्रमुख सूत्रधार अरबाज खान याला पोलिसांनी अटक केली. मुंबईत राहणाऱ्या अरबाज खानने आपला साथीदार नाजीर खानच्या मदतीने सोशल मीडियावर बनावट अकाउंट्स बनवून ते व्हायरल केले. त्यानंतर त्याने मुस्लिमांच्या व्हाट्सअप गृपमध्येही नकली व्हिडीओज आणि पोस्ट्स व्हायरल करत त्यांना एकत्रीत येऊन प्रतिक्रिया देण्याचे आवाहन केले. दंगली भडकताच त्याने अकाउंट्स बंद करून पोबारा केला. परंतु पोलिसांनी त्याला हुडकून काढलेच!
अकोल्यात दंगल उसळली तेव्हा अनेकांनी गृहमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परंतु राज्यातील कायदा-सुव्यस्थेबाबत देवेंद्र फडणवीस अजिबात तडजोड करत नाही. नक्षली, जेहादी आणि दंगलखोरांबद्दल त्यांची झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे. अकोल्यातून एकूण १५० हुन अधिक दंगलखोरांना पोलिसांनी उचलले आहे.
भीमा कोरेगाव दंगलीमागील माओवाद्यांचा पर्दाफाश गृहमंत्र्यांनीच केला होता. महाआघाडीच्या काळात महाराष्ट्रात फोफावलेल्या PFI चे अमरावती-मालेगाव दंगलींशी असलेले कनेक्शन उघडकीस आणले. पहिले गृहमंत्री आहेत ज्यांनी दाऊदच्या संपत्तीला हात घालून त्याचा लिलाव केला.