रयतवारी गावात पाच वर्षांपासुन नालीचा उपसा नाही
रयतवारी गावात पाच वर्षांपासुन नालीचा उपसा नाही
घानीचे साम्राज्य कोंडेखल ग्रामपंचायतचां प्रताप
सावली – सावली तालुक्यातील गट ग्रामपंचयत कोंडेखल अंतर्गत येणाऱ्या रयतवारी येथे मागिल ५ वर्षापासुन नालीतील मलमा उपसण्याचे काम करण्यात आले नाही वारंवार गावकऱ्याकडून ग्रामपंचायतला अर्ज करण्यात आले परंतु ग्रामपंचायतने अर्जाला केराची टोपली दाखवली. पावसाळयाची चाहुल लागत आहे पावसाळयाच्या पाण्याने नाल्या तुंळुब भरुन वाहतात त्यामुळे नालीतले पाणी हा नळाच्या स्वभोवताल साचुन राहते त्याच बोरवेचे पाणी गावातील गावकरी पिण्यासाठी वापरण्यात त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही तरी पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालीतील मलमा उपसुन नाली सफसुथरी करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे



