पेरणीसाठी स्वस्त दरात बी- बियाणे उपलब्ध
महाडीबीटी पोर्टल योजना.. अर्ज एक, योजना अनेक
राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या शीर्षका अंतर्गत ‘बियाणे’ घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा
उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधा अंतर्गत लाभार्थीना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान या योजनेतील सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, इत्यादी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांनी अर्ज करणे बंधनकारक आहे. योजने अंतर्गत प्रात्यक्षिक लागवडीसाठी मोफत बी- बियाणे तर बियाणे लागवडीसाठी ५० टक्के सुटीवर बियाणे कृषि विभागा अंतर्गत मिळत आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २५ मे आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सावली तालुका कृषि अधिकारी अश्विनी गोडसे यांनी केले आहे.सदर कामासाठी आपण आपल्या जवळच्या सी.एस.सी केंद्रावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे..



