Vidarbh24News

Latest Online Breaking News

*चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार

*सीडीसीसी सावली शाखेतर्फे निषेध*
सावली:प्रा.शेखर प्यारमवार
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत यांच्यावर गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात व्यक्तीने बंदुकीतून गोळी झाडली सुदैवाने ती गोळी संतोष रावत यांच्या हाताला चाटून गेले त्यामुळे रावत थोडक्यात बचावले या घटनेने संपूर्ण जिल्हाभरात खळबळ माजली आहे.
याचे पडसाद संपूर्ण जिल्हाभरात पसरले असून या घटनेचा निषेध म्हणून संपूर्ण मूल तालुका बंद आहे तसेच सीडीसीसी चंद्रपूर बँकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाखेचे कर्मचारी सुद्धा निषेध करीत आहेत. त्यातच सावली सीडीसीसी बँकेचे कर्मचारी सुद्धा या घटनेचा निषेध म्हणून ११ ते २ या वेळात काम बंद ठेवून निषेध व्यक्त करीत आहेत वरिष्ठांचे आदेशानुसार अकरा ते दोन या वेळात कुठलेही आर्थिक व्यवहार होणार नाहीत असे मत सीडीसीसी बँकेचे शाखा व्यवस्थापक तिजारे साहेब यांनी मांडले.शाखा व्यवस्थापक तिजारे , हेमंत भोपये, पवन धोटे, मारोती येनुगवार, संगीता गजबे, सुशील शिंदे इत्यादी कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!