उभ्या असलेल्या कारला ट्रकची धडक
गडचिरोली चंद्रपूर महामार्गावर कार क्र एम एच ३४ बी वी ९६८८ मध्ये बसून गावाला निघण्याच्या तयारीत असलेल्या तीन तरुणावर ट्रक क्र.एम एच १२ एम वी ०३४६ येऊन आदळले. कार तिन वेळा पलटी खाली मात्र नशीब बलवत्तर म्हणून कार मधील कुणाचीही जिवीत हानी झाली नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दुपारी दोन वाजताच्या सुमारास ताराचंद खोब्रागडे, कुणाल कोपुलवार आणि पवन पाल हे मित्र राहणार बोथली येथील असून आपले काम आटोपून गडचिरोली- चंद्रपूर महामार्गावरील चिमढा गावाजवळ रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या कार मध्ये बसले आणि कार सुरू करुन आपल्या गावाला येण्याच्या तयारीत होते तेवढ्यात मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक ने जोरदार धक्का दिला त्यामुळें कार तीन वेळा पलटीखाली त्यामुळे ताराचंद खोब्रागडे यांना गंभीर दुखापत झाली तर कुणाल कोपुलवार आणि पवन पाल हे किरकोळ जखमी झाले. कार पूर्णपणे चकानाचुर झालेली आहे.

जेव्हापासुन राष्ट्रीय महामार्ग क्र. ९३० झाला आहे तेंव्हापासून नेहमी रस्ते अपघात होत असतात त्यामुळे वाहन चालकांनी गतीचे नियंत्रण पाळून वाहन चालवावे आणि अपघात टाळावे अशी मागणी परिसरातील नागरिक करित आहेत.



