राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परिक्षेत रमाबाई विद्यालयाचे घवघवीत यश
● राष्ट्रीय आर्थिक दुर्बल यांची शिष्यवृत्ती परिक्षा २०२२ – २३ मध्ये घेण्यात आली त्या परीक्षेमध्ये रमाबाई आंबेडकर विद्यालय सावली येथील कु.अरुणा संतोष आभारे, कु.जान्हवी चरणदास लेनगुरे, कु.पायल अजय वालदे, कु.दिया गोकूलदास कोसनकर, कु.रिया राजेंद्र कुंभारे, व आदित्य नेताजी बोरकर हे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले असुन या सर्वांना वर्ग ८ वी ते १२ पर्यतच्या वर्गासाठी दरवर्षी १२००० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या सर्व विद्यार्थ्यास विद्यालयाचे शिक्षक एच. आर कस्तुरे, जी. एन. मेश्राम, माया निमसरकार, व विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.एल शेंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. उत्तीर्ण झालेल्या २४ विद्यार्थ्यां मधून पात्र ठरलेल्या सर्व विद्याथ्र्यांचे आणि मेहनत घेऊन मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल बोरकर संस्थासचिव प्रा. विशाखा गेडाम, संचालक भाऊराव गोवर्धन, संचालक वसंतराव बोरकर, संचालिका चंद्रभागाबाई गेडाम, संचालक देवाजी गोवर्धन, संचालक उत्तमराव गेडाम, विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. एल. शेंडे, पर्यवेक्षक एम.डी लाकडे, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सर्व पात्र विद्यार्थ्याचे अभिनंदन करून पुढील शेक्षणिक वाटचालीस सर्वांना शुभेच्छा दिल्या.



