शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 2 चा उपक्रम*
सावली: आज सावली येथे वर्ग पहिला च्या विध्यर्थी व पालक यांचा शाळा पूर्व तयारी मेळावा घेण्यात आला.यात विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात लेक्सिम व रॅली ने झाली, नंतर या कार्यक्रमाची सुरुवात विधेची आराध्य दैवत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला फुल, व माल्यार्पण करून करण्यात आली,

या कार्यक्रमाचे अध्यक्षा शाळा व्यवस्थापन समितिचे रत्नमाला गोमस्कर,पौर्णिमा मेश्राम,पायल दुधे,मुख्यध्यापिका बेले,मानकर म्याडम,चलाख सर,वाकडे म्याडम, योगेश रामटेके,मधुकर मेडपल्लीवार, आणि मोठया संख्येत पालक व विद्यार्थी उपस्थित होते, या कार्यक्रमात विध्यार्थी यांची बौद्धिक,शारीरिक चाचणी घेण्यात आली,विध्यार्थी यांच्या सुप्त गुणांना वाव मिलावा यासाठी विविध चाचण्या घेण्यात आल्या, यासाठी शाळा व्यवस्तपन समिती,विद्यार्थी पालक संघ यांच्या परिश्रमाने हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला



