बचत गट लोकमित्र लोकनाथ रायपुरे सन्मानित

*महिला आर्थिक विकास महामंडळाचा उपक्रम *
सावली ( बाबा मेश्राम/ लोकमत दुधे )
महिलाच्या आर्थिक विकास व सक्षमीकरणासाठी निर्माण करण्यात आलेल्या माविमच्या वतीने महिलाच्या आर्थिक उन्नती व स्वयंरोजगारासाठी बचत गटासाठी विविध योजनांची निर्मिती करण्यात आली,या बचत गटांना नेहमीच योग्य मार्गदर्शन व मदत करणा-या चकपिरंजी येथील बचत गट लोकमित्र लोकमाथ रायपुरे यांचा माविमच्या वतीने सत्कार करण्यात आला.तहसील कार्यालय सावली येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सावली. तहसीलचे नायब तहसिलदार चांदेकर, मंथनवार ,मावीम समन्वयक शेंडे, माविम सर्कल मॉनेजर देवेंद्रा मेश्राम सिंदेवाही,आदी उपस्थित होते.
माविमच्या माध्यमातून नेहमीच बचत गटांना मार्गदर्शन व मदत करण्यासाठी गावागावात चार ते पाच बचत गटांना एकत्रित करुन त्यांना योग्य मार्गदर्शन व विविध माहीती देण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून लोकमित्राची निवड करण्यात येत असते, असेच सावली तालुका मुख्यालयापासुन अवघ्या दिड किलोमिटर अंतरावर असलेल्या चकपिरंजी येथील लोकनाथ रायपुरे.या सामाजिक कार्यकर्त्याची बचत गटांतील सदस्याने लोकमित्र म्हणुन निवड केली, यात चकपिरंजी गावात रमाई बचत गट, आम्रपाली बचत गट, मायावती बचतगट, मायादेवी बचत.,आदी चार.बचत.गटातील सदस्यांनी विचार विनिमय करुन लोकनाथ रायपुरे यांची लोकमित्र म्हणुन निवड केली. ही बातमी निवड ,करताना.गावातील सर्व बचत गटांना मदत व.सहकार्य करणे,वेळोवळी त्यांच्या मदतीला हजर.राहणे या सोबतच बचत गटाच्या माध्यमातून महिलांना.रोजगार म्हणून व्यवसाय रुपी कुक्कुटपालन करणे ,कृषी खतांचा व्यवसाय करणे आदींची योग्य माहीती देण्यासाठी सहकार्य व प्रोत्साहित करणे, आदी कार्यांचा विचार करण्यात आला,या कार्यांनेच लोकनाथ रायपुरे यांचा सत्कार करण्यात आला हे विशेष.
नुकताच झालेल्या सत्कार समारंभी प्रसंगी चकपिरंजी येथील अर्जुन भोयर, ज्ञानेश्वर भोयर, दामोधर चौधरी, भास्कर दरडे, अम़ोल भैसारे, खुशाल भैसारे, व बचत गटातील महिला कविता भैसारे, ममता पेंदाम ,पायल रायपुरे आदींनी, लोकमित्र लोकनाथ रायपुरे यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या ……