*सुजित भसारकर यांची सावली तालुका व्हॉइस ऑफ मीडियाच्या सदस्य पदी नियुक्ती*
सावली:प्रा.शेखर प्यारमवार
महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे सदस्य असलेले, पाथरी येथील रहिवाशी,दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार सुजित भसारकर यांनी आज व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे यांच्या कार्यावर विश्वास ठेवत,व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय सचिव दिव्याताई भोसले, विभागीय अध्यक्ष मंगेशजी खाटीक,चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष संजय पडोळे यांचे उपस्थितीत सावली तालुका व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेत दाखल झाले.
व्हॉईस ऑफ मीडियाचे देशपातळीवर सुरू असलेले कार्य,व्हॉईस ऑफ मीडियाची पंचसुत्री,पत्रकार आणि पत्रकारांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना असून ही कार्य अभ्यासून,त्या कार्याला प्रेरित होऊन त्यांनी व्हॉईस ऑफ मीडियामध्ये निस्वार्थपणे कार्य करण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा संघटक चंद्रकांत गेडाम,तालुका अध्यक्ष प्रवीण झोडे,कार्याध्यक्ष प्रा.विजय गायकवाड,डॉ.शेखर प्यारमवार, टीकाराम म्हशाखेत्री,उमेश गोलेपल्लिवार,नासिर अंसारी,सौरव गोहणे,गिरीश चीमुरकर,नितीन गोहने,चंद्रकांत प्रधाने,रुपचंद लाटेलवार,यांनी अभिनंदन केले तसेच संपूर्ण तालुक्यात त्यांचे अभिनंदन होत आहे.



