*मानव – वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक – वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण विरुटकर
सावली वनपरिक्षेत्र अधिकारी(प्रादेशिक) यांचे आमदार विजय वडेट्टीवार यांना निवेदन*
प्रतिनिधी:प्रा.शेखर प्यारमवार
सावली वनपरिक्षेत्र हे संवेदनशील असून या परिसरात वाघ व बिबट यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. तसेच वाघ व बिबट यांच्या हल्ल्यात मनुष्यहानीच्या घटना नेहमी घडत आहेत त्यामुळे जनमानसात वनविभागाबाबत प्रचंड आक्रोश निर्माण होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात आजपर्यंत एकूण ५२ बळी गेले आहेत, त्यापैकी सावली तालुक्यात १८ जणांचा वाघाने बळी घेतलेला आहे, चंद्रपूर जिल्ह्याचा विचार करता एक तृतीयांश बळी हे एका सावली तालुक्यातील आहेत ही गांभीर्याची बाब आहे.

मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता आणि जनतेचा वनविभागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी सावली वनपरिक्षेत्र मध्ये अनेक साहित्याचा अभाव आहे आणि ते साहित्य प्रत्येक वन परिक्षेत्रात असणे अगत्याचे आहे त्या माध्यमातून मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता उपाय करता येतील त्यासाठी वन परिक्षेत्र ( प्रादेशिक ) अधिकारी प्रवीण विरुटकर आणि कार्यरत कर्मचाऱ्यांनी ब्रम्हपुरी – सावली क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांना नुकतेच निवेदन सादर केले आहे.



