*समजाभिमुख शिक्षण देणारे थोर समाजसुधारक – प्रा.राजू केदार
विश्व शांती विद्यालयात महात्मा फुले जयंती साजरी
प्रतिनिधी:प्रा.शेखर प्यारमवार
भारत शिक्षण प्रसारक मंडळ, सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये सामाजिक क्रांतीचे अग्रदूत,थोर समाज सुधारक,थोर विचारवंत,संपूर्ण भारतात शैक्षणिक क्रांती घडवून आणणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय रवींद्र मुप्पावार सर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक अरुण राऊत, ज्येष्ठ शिक्षक मिलिंद सूपले, डी.यू.दुधे सर मंचावर उपस्थित होते.
जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक प्रा.धनंजय गुरनुले,प्रा.राजू केदार,प्रा.मिलिंद सूपले यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्याकडून भाषणे आणि गीत सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक प्रदीप कोहळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा.राजू झोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.



