क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती पतसंस्थेत साजरी
आज दिनांक ११ एप्रिल रोजी महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था, सावलीच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष सोमनाथजी वाढई, उपाध्यक्षा बेबीताई अंबादासजी गावतुरे, सचिव नितेश हेमकांतजी रस्से यांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास व सावित्रीमाई फुले यांच्या फोटोस मार्लापण व दीप प्रज्वलन करून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक गेंद्रनाथ मोहुर्ले, लेखापाल देवराव मोहुर्ले, लिपिक सुखदेव चौधरी व शिपाई मुकेश वाढई तसेच माननीय सर्व संचालक मंडळ व दैनिक अभिकर्ते उपस्थित होते.



