येवली येथे डाकयोद्ध्यांचा मदतीचा हात..
येवली येथे डाकयोद्ध्यांचा मदतीचा हात..
गडचिरोली जिल्यातील येवली ग्रामीण भागातील शेकडो खातेदारांना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातूण 5 लाखांची रक्कम केली वाटप.
विदर्भ 24न्यूज़
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
येवली:- राज्यभर लॉकडाउनमध्ये सामान्य नागरिकांना विविध बँकांतील पैसे काढून देण्याची सेवा भारतीय डाक विभागाने हाती घेतले आहे. त्यामुळे इतर बँकेतील पैसे ,मातृत्व योजना त्याचबरोबर ,प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसह अन्य योजनांचे पैसे पोस्टामार्फत ग्राहकांना घरपोच सेवा दिले जात आहेत. कोरोनाच्या संसर्गात डाकयोद्ध्यांनी लॉकडाउनच्या काळात जोखीम पत्करून एईपीएस( AEPS) सुविधेद्वारे आधार बनण्याचे काम डाकसेवक करत आहेत. ग्रामीण भागातील शेकडो खातेदारांना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातूण 5 लाखांची रक्कम येवली येथील पोस्ट मास्टर दिनकर पींपळकर, यांनी घरपोच केली आहे. यामुळे महिला,ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना मदत झाली आहे. लॉकडाउनमध्ये नागरिकांची
आर्थिक कोंडी होऊ नये यासाठी आपले डाकसेवकांकडून मोठी मदत होत आहे. खातेदाराच्या खात्यात जमा होणारे पैसे आधार क्रमांक , बँक पासबुक व मोबाईल क्रमांक यांच्या माध्यमातून विनामोबदला घरपोच सेवा देण्याचे काम डाकसेवक मोठ्या जबाबदारीने पार पाडत आहे . यामुळे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ,तसेच ज्या पेन्शनधारकांना चालता येत नाही,अशा अन्य योजनांच्या अनेक खातेदारांना त्या लाभार्थ्यांना मदत झाली आहे. मागणीप्रमाणे घरपोच पैसे दिले आहेत.पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून असा सुंदर ऊपक्रम राबवीत येवली येथील पोस्ट मास्टर दिनकर पींपळकर, यांनी विविध प्रकारच्या बँकेच्या बचत खात्यावरील व्यवहार पुरविला आहे.



