Vidarbh24News

Latest Online Breaking News

*हरणघाट (पारडी) मंदिर परिसरालगत दारू विक्री जोमात

*दारू विक्रेत्यावर कारवाई करून दारू विक्री तात्काळ बंद करावी – संत मुर्लीधर स्वामी महाराज

प्रतिनिधी-:प्रा.चंद्रशेखर प्यारमवार
सावली वरून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या हरणघाट (पारडी) पोस्ट कवठी येथे श्री संत मुर्लीधर धाम कार्तिक स्वामी हनुमान मंदिर देवस्थान आहे.
मंदिराचे अध्यक्ष संत मुर्लीधर स्वामी महाराज यांची ख्याती जिल्हा सह परराज्यात पोहचली आहे. विविध ठिकाणावरून भाविक भक्त महाराजांच्या भेटीस येत असतात. अनाथ मुलांची सेवा, शिक्षण, वृद्धाची सेवा, गो-पालन, सोबतच मंदिराच्या माध्यमातून विविध कामे, समाजिक उपक्रम केली जातात तरी या पवित्र श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणा लगतच सर्रास अवैध दारू विक्री केली जात आहे, मंदिराच्या प्रवेश द्वारा समोरील परिसरात रोड लगत मनोज मेश्राम यांचे हॉटेल आहे ते हॉटेल त्यांनी भाडे तत्वावर सावली येथील युवराज कुंभारे नामक व्यक्तीला दिले, मात्र सदर व्यक्तीने हॉटेल सोबतच अवैध दारू विक्रीचा व्यवसाय थाटला. कवठी, पारडी येथील दारू पिणाऱ्या व्यसनी लोकांना हे ठिकाण जवळच असल्यामुळे त्यांचे व गडचिरोली जिल्हात दारू विक्री वर बंदी असल्यामुळे नदी पलीकडील लोकांचे या परिसरात कल वाढल्याने त्या परिसरात दारू पिणाऱ्यांच्या रांगा च रांगा लागल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून या परिसरात जोमात अवैध दारू विक्री चा व्यवसाय चालू असल्यामुळे याचा नाहक त्रास मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांना व शाळेत जाणाऱ्या मुला- मुलींना होत असल्यामुळे मंदिराचे अध्यक्ष मुर्लीधर महाराज यांनी याविषयी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविली या तक्रारीची दखल घेऊन अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर धाड टाकून दारू जप्त करीत त्यावर 65(ई) दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या करावाही मुळे भांबाविलेल्या हॉटेल मालकाने पारडी येथील राजू वाघरे नामक व्यक्तीला आमिष दाखवीत दारू पाजून संत मुर्लीधर महाराज याविरुद्ध भडकविल्यामुळे त्याने राम नवमी च्या दिवशी महाराज पूजा करून बाहेर येताच अश्लील भाषेत शिवीगाळ करीत जीवे मारण्याची व मंदिर पाडून, हाकलून लावण्याची धमकी दिली. त्यामुळे वाघरे यावर दारू पिऊन शिवीगाळ केल्या प्रकरणी आरोपीवर कलम 504, 506 भां द वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण पोलीस विभागाकडून झालेल्या करावाही ने सुद्धा या अवैध दारू विक्री करणाऱ्याने कारवाहीला न जुमानता त्याच ठिकाणी लपून छपून सर्रास दारू विक्री जोमात चालूच ठेवल्याचे निदर्शनास येत आहे. मंदिर परिसरातील शांतता पूर्णपणे भंग होत भाविक भक्तांना व शाळकरी मुले, मुली, प्रवाशी यांना नाहक त्रास सहन करावं लागत असल्याने प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष केंद्रित करून दारू विक्रीवर आळा घालावा व मंदिर परिसरातील शांतता कायम राखण्यास मदत करावी असं यावेळी संत मुर्लीधर महाराज यांनी मागणी केली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!