Vidarbh24News

Latest Online Breaking News

सावली व मूल तालुक्यातील खाजगी शिक्षण संस्थाची सहविचार सभा संपन्न*

सावली : स्थानिक विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय येथे मूल व सावली तालुक्यातील खाजगी शिक्षण संस्था चालकांची सहविचार सभा संपन्न झाली. भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे अध्यक्ष संदीप गड्डमवार यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला शिक्षण संस्थाचालक संघाचे जिल्हाध्यक्ष डाँ. अनिल शिंदे, सचिव प्राचार्य सूर्यकांत खनके, पदाधिकारी लक्ष्मण धोबे उपस्थित होते. सभेला मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ नागपूर विभागाचे सचिव तथा जिल्हाध्यक्ष डाँ. अनिल शिंदे यांनी विविध विषयांना हात घातला. खाजगी संस्थांनी ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक सेवा राबवून आतापर्यंत तळागाळातील विद्यार्थ्यांना पुढे नेण्याचे काम केलेले आहे. एकेकाळी संघटनेची गरज लक्षात घेऊन सरकारकडे प्रश्न मांडायचा व तो प्रश्न मंत्रालयाने सोडवायचा ही परंपरा होती. परंतु पवित्र पोर्टल व नान सॅलरी तसेच कर्मचारी भरती बंदी आणून खाजगी शिक्षण संस्था चालकांचे अधिकार सरकारने जाणून बुजून संपुष्टात आणलेले आहेत. अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सदर पोर्टलच्या विरोधामध्ये या मंडळाने आवाज उठवला. विद्यमान न्यायालयाने खाजगी संस्थांच्या बाजूने न्याय दिला. तसेच वेतनेत्तर अनुदान १२ टक्क्यावरून चार ते पाच टक्के देण्याचे सरकारने कबूल केले परंतु आता विशिष्ट रक्कम अनुदानासाठी देऊन महाराष्ट्रातील सर्व संस्थांना ती वाटप करण्यात यावी हया हेतूने अनुदान मंजूर करण्यात आले. त्यामुळे आता चार किंवा पाच टक्के हा विषय राहिला नाही. याचाही त्यांनी खंत व्यक्त केली . तसेच आज खाजगी शिक्षण संस्था चालवताना शिक्षकेतर कर्मचारी बंदी आहे . शालेय परिसरामध्ये मैदान स्वच्छता, स्वच्छतागृहाची स्वच्छता, वर्ग खोल्या यांची गरज असते. त्या जागी त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती शासन करीत नाही. आणि अपेक्षा मात्र व्यक्त केली जाते. त्यामुळे शिक्षण संस्था कशा चालवायच्या हा मोठा प्रश्न पडलेला आहे. सर्व शिक्षण संस्था चालकांनी एकत्रित येऊन या विषयावर गंभीर चर्चा करावी यासाठी नागपूर मध्ये संस्था चालकांची सभा आयोजित केलेली आहे. असे त्यांनी सांगितले.

सभेचे प्रास्ताविक करताना भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे सचिव राजाबाळ पाटील संगीडवार यांनी सरकारच्या वेगवेगळ्या शासन निर्णयाचा परिणाम शिक्षण संस्थावर होत असल्याची खंत व्यक्त केली. त्यावर चर्चा करण्याच्या हेतूने या सभेचे आयोजन करण्यात आले असे त्यांनी सांगितले. सभेला शिक्षण संस्थाचालक अनिल स्वामी, कांतिलाल बोरकर, के.आर. खोब्रागडे, प्रभाकर गाडेवार, रमाकांत डोईजड, सुनील बल्लमवार आदी शिक्षण संस्था चालक उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!