*महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रोत्साहन अनुदान योजनेची पाचवी यादी प्रकाशित*
सन २०१७-१८ -१९ -२० या वर्षातील कर्जाची नियमित कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतून पन्नास हजार रुपयाचे अनुदान प्रोत्साहन देण्यात येत आहे आतापर्यंत या योजनेच्या चार याद्या जाहीर करण्यात आले होत्या, शेतकरी पाचव्या यादीची वाट पाहत होते आता पाचवी यादी प्रकाशित करण्यात आली आहे ही यादी २९ मार्च २०२३ रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार हे पैसे लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जातील आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी केवायसी केलेली करणे बाकी आहे त्यामुळे अनुदानाचे पैसे मिळण्यास विलंब होत आहे मात्र आता ज्या शेतकऱ्यांची एक अशी पूर्ण केली आहे त्यांना अनुदानाचा लाभ दिला जात आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याची यादी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर प्रकाशित करण्यात आली. या योजने अंतर्गत जे शेतकरी कर्ज उचलून नियमित कर्जफेड करत असतील अशा शेतकऱ्यांना ५०,०००/- रुपयाचे अनुदान महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त होते.
३१ मार्चपर्यंत बाकी असलेल्या सर्व शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहित अनुदान देण्यासाठी सहकार आयुक्ताकडून बँकांना आदेश देण्यात आली आहे. जे शेतकरी पन्नास हजार अनुदानापासून वंचित आहेत त्यांना लाभ देण्यासाठी याद्या प्रकाशित करण्यास सुरुवात झाली होती.
तुमच्या जिल्ह्याची तालुकानुसार यादी पाहू शकता अर्थात डाऊनलोड करु शकता तुमच्याजवळ आय डी पासवर्ड नसेल तर सगळ्यात सोपी पद्धत तुमच्या जवळच्या म्हणजेच तुमच्या आसपास असलेल्या सीएससी केंद्रात जाऊन ही यादी पाहू शकता अर्थात आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन पाहू शकता.



