कु.सुनिता टिपले,उमरे ह्या डाॕ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
*कु.सुनिता टिपले,उमरे ह्या डाॕ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित* ……………
दिनांक 26/03/2023 रोज *रविवारला नागपूर येथिल हिंदी साहित्य सम्मेलन सभागृहामधे कु.सुनिता टिपले ,उमरे शिक्षिका प.स.राजुरा,जि.चंद्रपुर यांना डाॕ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार 2023 देऊन सन्मानित करण्यात आले.सुनिता टिपले,उमरे यांच्या सामाजिक तथा शैक्षणिक कार्याची दखल घेऊन जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा.दिपककुमार खोब्रागडेसर तथा अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे माजी अध्यक्ष मा.डाॕ.श्रीपाल सबनिस सर पुणे,मा.डाॕ.महेश चौगुले कर्णाटक,मा.डाॕ.मधुकर वानखेडे दिल्ली,या मान्यवरांच्या हस्ते जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या ९व्या वर्धापण दिनाचे औचित्य साधून ग्रंथ प्रकाशन तथा पुरस्कार वितरित करुन सन्मानित करण्यात आले*. *मा.कु.सुनिता टिपले,उमरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन मागील वर्षी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.फुले-भिमोत्सव एप्रिल २०२२औरंगाबाद चा राज्यस्तरिय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ..तसेच शैक्षणिक कार्यातील योगदानाबद्दल त्यांना राज्यस्तरिय आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२२ मुंबई येथे देऊन सन्मानित करण्यात आले … *सुनिता टिपले,उमरे यांच्या कार्याचे परिसरात सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे*