*सावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे खासदार राहुलजी गांधी यांच्या विरोधातील कारवाईचा केंद्रातील मोदी सरकार विरोधात निषेध आंदोलन*
सावली
चंद्रशेखर प्यारमवार
केंद्रातील मोदी सरकारकडून मनमानी, हुकूमशाही राज्यकारभार चालू असून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे.अनेक जनविरोधी निर्णय घेतले जात आहेत.काँग्रेसचे नेते खासदार राहुलजी गांधी यांनी मोदी सरकारचा खरा हुकुमशाहीवृत्तीचा भ्रष्ट चेहरा जनतेसमोर आणला.त्यामुळे केंद्र सरकारकडून सुडबुद्धीने अनेक ठिकाणी खटले दाखल करून त्यांना अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारविरोधात मा.संदीप पा. गड्डमवार, माजी जि.प.उपाध्यक्ष आणी मा.दिनेश पा. चिटणुरवार माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर यांच्या नेतृत्वात आज मा.आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार जनसंपर्क तथा काँग्रेस पक्ष कार्यालय ते बस स्थानक चौका पर्यंत निषेध आंदोलन करण्यात आले.
देशातील जनतेला भारतीय जनता पक्षाने मोठमोठी स्वप्ने दाखवित सत्ता काबिज केली. त्यानंतर मागील आठ वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकारने अनेक जनविरोधी निर्णय घेतले आहेत. महागाई कमी करण्याचे आश्वासन देणाऱ्या या सरकारच्या काळात देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्या या सरकारच्या काळात सर्वाधिक बेरोजगारी वाढली. पिकाला योग्य भाव देण्याचे आश्वासन देणारे हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाही. महिला सुरक्षिततेच्या थापा मारणारे हे सरकार महिलांचे संरक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
त्यामुळे देशातील सर्वच घटकांमध्ये या सरकारविरोधात संताप व्यक्त होत आहे.तर, दुसरीकडे खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशातील सर्व घटकांशी संवाद साधून त्यांचे दुख समजून घेतले. केंद्रातील सरकारचा खरा भ्रष्ट चेहरा जनतेसमोर मांडला. त्यामुळे देशातील जनतेचा या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
त्यामुळे केंद्रातील मोदी सरकार, भाजपकडून खासदार राहुलजी गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच सुडबुद्धीने अनेक ठिकाणी खटले दाखल करून अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशाच एका प्रकरणात गुजरातच्या सुरत न्यायालयाने राहुलजींना काल दोन वर्षांची शिक्षा सुनावली व खासदारकी रद्द केली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या या षडयंत्राविरोधात तीव्र आंदोलन करण्याच्या सूचना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांनी दिल्या होत्या. त्यानुसार सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या वेळी माजी प.स.सभापती मा.विजय कोरेवार, सावली शहराध्यक्ष व नगरसेवक मा. विजय मुत्यालवार, सावली नं.प.च्या नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे, उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार, माजी सभापती मा. राकेश पा.गड्डमवार, माजी उपसभापती मंगलाताई चिमड्यालवार,सरपंच संघटनेचे अध्यक्ष मा.पुरषोत्तम चुदरी, विजय गड्डमवार,चक्रधर दुधे, सुनील पाल,अनिल गुरुनुले, प्रवीन गेडाम,केशव भरडकर, विनोद भांडेकर ,मोहन कुनघाडकर,चुडीराम कोलते, टिकाराम रोहणकर, रुपाली कन्नाके,चुडीराम कोलते,तेजराम बोदलकर, कविता मुत्यालवार , विद्यासागर बिके ,भावना बीके, योगिता बुगदलवार शिला गुरुनुले नं.प.सावलीचे नगरसेवक प्रफुल वाळके, प्रीतम गेडाम,गुणवंत सुरमवार,सचिन सांगिडवार,अंतबोध बोरकर व नगरसेविका साधना वाढई, सिमा संतोषवार,प्रियांका रामटेके,अंजली देवगडे,ज्योती शिंदे तसेच काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



