पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानववस्तित, जख्मी चितळाला जिवदान.

लुंबीनीनगर, बाबुपेठ नजिकचे जंगलातील चितळ वन्यप्राण्याचा कळप पाण्याच्या शोधात मानववस्तित प्रवेश केल्याने गावठी कुत्रे त्यांचा पाठलाग केला असता कळप जंगलात पळाला. मात्र एका चितळास कुत्र्यानी जखमी केले. वार्डा तील सूद्ण्य नागरिकांनी कुत्र्याना हाकलून लावत जख्मी चितळास पकडून विलास कोसनकर वनपाल यांच्या निवासस्थानी आणले असता जख्मीस पाणी पाजुन सुरक्षा दिली व कारेकर व.प.अ. , राजेश पाथर्डे क्षेत्र सहाय्यक चंद्रपुर, प्रदिप कोडापे वनरक्षक बाबुपेठ यांना माहिती दिली.
Pविलास कोसनकर वनपाल यांनी लेबर कोर्टात जावयाचे थांबून जमाव पांगवुन जख्मी चितळास सुरक्षित ठेवून प्रदीप कोडापे वनरक्षक चारचाकी वाहनाने पोहचताच त्यांच्या ताब्यात दिले. चितळास वन्यप्राणी वैद्यकीय उपचार केंद्र, चंद्रपुर येथे दाखल करुन जख्मी चितळ तंदुरुस्त असल्याची खात्री केली. वनक्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर भरपुर प्रमाणात असुन पाणवठ्यांची अत्यंत आवश्यकता असल्याची चर्चा स्थानिकांत आहे.