सावली तालुका भाजपा महिलांच्या वतिने भव्य कबड्डी सामने
सावली तालुका भाजपा महिलांच्या वतिने भव्य कबड्डी सामने
सावली : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज सावली येथील भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आयोजित भव्य तालुकास्तरीय महिलांच्या कबड्डी सामन्यांचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते अध्यक्षस्थानावरून बोलतांना
केंद्रशासनामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. महिलांना शिक्षित, सक्षम आणि स्वयंपूर्ण बनविण्यासाठी बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०१५ रोजी केला. या योजनेचा मुख्य उद्देश मुलींचा जन्मोत्सव साजरा करणे आणि शिक्षणाद्वारे त्यांना सक्षण बनविणे, मुलीचा जन्म आणि तिचे जगणे सुरक्षित करणे हा आहे.
महिलांच्या शिक्षणाची सुरुवात फुले दाम्पत्यानी केली त्यावेळी त्यांना समाजाच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले होते. पण तरीही सगळ्या प्रकारचा विरोध पत्करून त्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ चालू ठेवली. त्याचेच फलस्वरूप म्हणून आज सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर असल्याचे
आपणास दिसते.त्यासाठीआंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे आहे असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या पाठीशी महिला ही असतेच. असे व्यक्तव्य खासदार महोदयांनी या प्रसंगी केले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाध्यक्ष अध्यक्षस्थानी केले. पुढे बोलतांना देवरावदादा भोंगळे यांनी शिवरायांच्या स्वराज्य स्थापन करण्यामागील प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ, स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला या महिला जागतिक दिनी वंदन करतो. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व ज्याला स्त्री आई म्हणून कळली, तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहिण म्हणून कळली. तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला.
आजकाल महिला अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात काम करत आहेत. असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यात महिला अग्रेसर नाहीत. पूर्वी महिलांना हिन वागणूक दिली जात होती. परंतु, आजकालच्या महिलांच्या प्रत्येक कलागुणांना वाव दिला जातो. असे प्रतिपादन यावेळी केले. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अल्काताई आत्राम यांनी महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण, महिला सशक्तिकरण, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये महिला काम करीत आहे आणि विविध
आहे. आणि कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा जिल्हाभर होत आहे. असे याप्रसंगी महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजक प्रास्ताविक निलीमाताई सुरमवार सूत्रसंचालन शोभाताई बावनवाडे, आभार प्रदर्शन छायाताई शेंडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व महिलांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला मंचावर, जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, महीला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अल्का आत्राम, ओबिसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष अविनाश पाल, जेष्ठ नेते, महामंत्री तथा नगरसेवक सतिश बोम्मावार, कोषाध्यक्ष अर्जुन भोयर, शहराध्यक्ष, सदस्या मनिषा चिमुरकर, योगीता डबले, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष पुष्पा शेरकी, माजी सभापती छाया शेंडे, नगरसेविका निलीमा सुरमवार, नगरसेविका शारदा गुरनुले उपस्थित होत्या.