Vidarbh24News

Latest Online Breaking News

मुंबई विद्यापीठ इतिहास विभागप्रमुख डॉ संदेश वाघ यांचे ब्रह्मपुरी येथे व्याख्यान संपन्न*

डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था(चांदा), ब्रह्मपुरी द्वारा संचालित डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, (ब्रह्मपुरी) इतिहास, राज्यशास्त्र आणि आंबेडकर विचारधारा विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय लोकशाही या विषयावरती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येवर 9 मार्च 2023 रोजी डॉ.संदेश वाघ,प्राध्यापक व इतिहास विभाग प्रमुख,मुंबई विद्यापीठ तथा अध्यक्ष आंबेडकराईट हिस्टरी असोसिएशन यांचे मार्गदर्शनपर विशेष व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉ.देवेश कांबळे हे होते. याप्रसंगी बोलताना डॉ. संदेश वाघ यांनी सांगितले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार असे मानले जाते हे सत्य आहे .परंतु खऱ्या अर्थाने डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय लोकशाहीचेही मुख्य शिल्पकार आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय लोकशाहीला सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये परिवर्तित करण्याकरता अथक प्रयत्न केले असे त्यांनी प्रतिपादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक लोकशाहीची संकल्पना ही लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात कोणताही रक्तपात न घडवून आणता क्रांतिकारी बदल घडवून आणणारी संकल्पना होती. बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून लोकशाही म्हणजे सहजीवन होय आणि लोकशाहीच्या माध्यमातून लोकांनी सनदेशीर मार्गानेच त्यांचे प्रश्न सोडविणे अत्यंत आवश्यक असे बाबासाहेब यांनी म्हटले आहे असे त्यांनी सांगितले. बाबासाहेबांनी असेही सांगितले की संसदीय लोकशाही टिकवणे हे अत्यंत गरजेचे आहे कारण स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय अबाधित ठेवण्याकरता भारतामध्ये संसदिय लोकशाही टिकणे हे अत्यंत गरजेचे आहे . बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीचे कट्टर पुरस्कर्ते होते त्यांचा लोकशाहीवर विश्वास होता असे डॉ संदेश वाघ यांनी या ठिकाणी प्रतिपादित केले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ देवेश कांबळे यांनी सांगितले की भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि तिचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य मा. रिमा कांबळे, डॉ. स्निग्धा कांबळे उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इतिहास विभाग प्रमुख डॉ.रुपेश मेश्राम आणि राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.लोकेशकुमार नंदेश्वर यांनी अथक प्रयत्न केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!