महिला विषयक कायदे कार्यशाळा
राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य महाविद्यालय सावली येथील महिला तक्रार निवारण समितीच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महिला विषयक कायदे या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक खोब्रागडे होते त्यांनी आपल्या भाषणातून महिलांनी अधिक शिक्षण घेऊन सक्षम व्हावे असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे मुख्य अतिथी , एडवोकेट आंबटकर यांनी महिलांकरता असणारी विविध कायदे त्यात पुनर्विवाह कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा ,महिला संरक्षण कायदा, वारसा कायदा, संपत्तीचा कायदा इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून प्राध्यापक महानंदा भाकरे यांनी महाविद्यालयीन परिसरामध्ये लैंगिक छळाचे जर प्रश्न उपस्थित झाले तर ते सोडविण्याकरिता महाविद्यालयामध्ये महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्याची रचना, कार्य याविषयीची माहिती सांगितली
तसेच या कार्यक्रमाचे संचालन कुमारी सरिता पोटे हिने केले तर आभार कुमारी मानसी नायबनकर हिने मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक वासाडे, प्राध्यापक उराडे, प्राध्यापक बडवाईक, प्राध्यापक गुरनुले ,प्राध्यापक बोरले ,प्राध्यापक वासेकर, प्रा. वैराळे, प्रा. पवार,प्रा. बागडे इत्यादी मंडळीनी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.



