पक्षी घागर वाटप करुन होळी साजरी
मुल येथील वार्ड नं.१५ मधील युवकांनी होळी करिता वर्गणी गोळा करून त्यातूनच प्रत्येक कुटुंबाला एक याप्रमाणे पक्षी घागर वाटप करुन होळी साजरी केली. होळी पेटविण्यकरिता कुठल्याही प्रकारची वृक्षतोड न करता आजुबाजुचा पालापाचोळा आणि तुराट्यांचा वापर करण्यात आला. पक्ष्यांचं आपल्या जिवनात असलेले महत्त्व आणि वाढती उष्णता लक्षात घेऊन मुल येथील वार्ड नं.१५ मधील युवकांनी पुढाकार घेऊन कमीत कमी आपल्या वार्डातील लोकांनी पक्षांसाठी पाणी ठेवावे हा उद्देश ठेवून पक्षी घागर वाटप करण्याचे ठरविले.यासाठी नागपूर विभाग अध्यक्षा रत्ना चौधरी, नागपूर विभाग सहसचिव गुरुदास चौधरी, मुल तालुका संघटिका नंदा शेंडे, तालुका संघटिका वंदना गुरनुले, जेष्ठ नागरिक जिरकुंटवार सर,गुंडोजवार सर, गुरनुले सर, शेंडे सर युवावर्ग अनिकेत बुग्गावार,विप्लव चौधरी,शुभम भाकरे, अनिकेत निंबाळकर,सुमीत मानमपल्लीवार,सक्षम मोहुर्ले यांनी सहकार्य केले.वार्डात सर्वत्र युवकांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.



