Vidarbh24News

Latest Online Breaking News

जागतिक महिला दिनविशेष

……………………………
जागतिक महिला दिनविशेष
अंकुश मोरेश्वर
मनबत्तुलवार उपरी
………………………………

महिलांचा करा सन्मान,
देश बनेल महान,
जबाबदारीसह घेते भरारी,
नाव तिचे आहे नारी.
महिला दिन म्हटल्यावर आपणास समजते की हा दिवस महिलांचा आहे आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जी व्यक्ती साथ देते त्या आईचा आज दिवस मग त्या जगात ती आपल्याला खुप काही शिकवून जाते त्या गोष्टींचा विचार आपणाला करणे आवश्यक आहे आज महिला दिन आहे हा दिवस आपल्या भारतात नाही तर सर्व जगात साजरा केला जातो.

असे म्हणतात की या जगात व्यक्ती जिवंतपणी कळत नाही तर ती जगातून निघून गेल्यावर कळते. जन्माला आले तर मरण चुकला नाही पण कायम दुसऱ्यासाठी झटत असलेले व्यक्तिमत्व गेले की त्रास होतो. दुसऱ्याच्या लेकराला माया देणे सोपे नाही पण आजही ते जगात अनेक आई आहेत ते यातना सहन करून आपल्या लेकरांना उंच शिखरावर यश प्राप्त करण्यात मोलाची ठरली आहे आईच्या पोटातून जन्म घेतल्यानंतर सर्वांना आपल्या आईचा गर्व असतोच धावपळीच्या जीवनात अनेक प्रसंगाना तोंड देत उभी असते ती आई. जीवन जगण्याची जीवनाला आकार देण्याचे काम एक महिलाच करू शकते आपल्याला काय जीवनात करायला पाहिजे म्हणजे त्या जगातील सर्व महिलांचे उपकार परतफेड होईल. मागच्या महिन्यात आपल्या राजाची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली तो शिवबा फक्त त्या राजमाता जिजाऊमुळे घडला ते पण एक स्त्री होती आईच्या आधीच्या काळात नव्हते तंत्रज्ञान, शिक्षण तरी पण शिवबाला घडवणारी जिजाई माता होती असे म्हणतात की, जोपर्यंत चंद्र ,सूर्य, तारे आहेत तोपर्यंत जिजाऊ तुझे नाव आहे मग आपल्या युगात फक्त त्या शिवबाची राजमाता जिजाऊची जयंती साजरी करून मिळवणार आहोत की राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवरायांच्या यांच्या कार्याची, विचारांची गर्दी करून आजच्या तरुण पिढीला समाजात सुसंस्कृत जीवन जगण्याची कला शिकवणे आजच्या युगात महत्त्वाचे आहे.
या जगात या थोर संतांचे, महापुरुषाचे कार्य त्यांचे विचार नव्या पिढीला मार्गदर्शक आहेत ते त्यांना समजावून देणे आवश्यक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे आदर्श उदाहरण आहे त्याचाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारताचे संविधान तयार केले आहे याच संविधानात समाजातील प्रत्येक दुर्बल घटकाला न्याय मिळवून देण्याची तरतूद आहे महिलांना पुरातन काळात समानतेची वागणूक मिळत नव्हती पण आज स्त्रिया चूल आणि मूल एवढंच जीवन म्हणून न राहता आपले जीवन सशक्त व निर्भीडपणे जगण्यास समर्थ बनत आहेत. स्त्रियांनी कोणत्याही क्षेत्रात सदैव अग्रेसर असायला हवे स्त्रिया आपल्या संसार सांभाळून समाजातील प्रत्येक गोष्ट प्राप्त करण्यास प्रयत्नशील आहेत.

ज्या पद्धतीने राजमाता जिजाऊने शिवबाला घडविले क्रांतीज्योती सावित्रीबाई आपल्या पतीच्या शैक्षणिक कार्यात मदत केली व देशातील स्त्रियांना शिकवण्यासाठी जो क्रांती संघर्ष केला तो डोळ्यासमोर ठेवून आपल्या परिवाराला मुळाबाळांना समाजाचे उत्तम नागरिक म्हणून जाण्यास समर्थ बनविले पाहिजे. आजच्या २१ व्या शतकात सुद्धा महिलांवर होणारे अत्याचार व महिलांचा अनादर याला जेवढे पुरुष जबाबदार आहेत तेवढेच ती स्त्री जबाबदार आहे कारण महिला आपल्या अधिकार-कर्तव्य काय आहे हे आजपर्यंत ओळखू शकले नाही. प्रत्येक पुरुषाने स्त्रियांचा आदर करायला शिकले पाहिजे. समाजात मानाचे स्त्रियांना जोपर्यंत स्थान मिळणार नाही तोपर्यंत या महिला दिनाचे उद्दिष्ट साध्य होणार नाही ज्यांच्या घरी स्त्रियांना मानाचे स्थान नाही तेथील पुरुष कधीच समाजात सुसंस्कृतपणे वागू शकणार नाही हो महापुरुषांच्या जयंती साजरा करून काही उपयोग नाही जोपर्यंत आपण त्यांचे विचार समाजात पेरू शकत नाही, तेव्हा संत महापुरुष यांच्या कार्याचे दाखले समाजापुढे ठेवणे महत्त्वाचे आहे.जिजाऊ यांनी ज्याप्रमाणे शिवबाला घडविले आपल्याला त्या आई आठवतील सिंधुताई सपकाळ. त्या आईला माझे वंदन तिच्या कार्यास नतमस्तक आहोत.
जिने अनाथाला आधार दिला आईप्रमाणे सांभाळून आदर्श जीवन जगण्यास मदत केली सिंधुताई चा त्याग हा आपल्या डोळ्यासमोर एक मोठे उदाहरण आहे विदर्भातील एका खेड्यात जन्मलेली मुलगी जी मुलगी आपल्या आई-वडिलांना नकोशी होती ती संधीताई सपकाळ होती. बापाने लग्न लावून दिला कुणाचा आधार नाही नवऱ्याने सोडून दिले, तरी स्वतः हालअपेष्टा सहन करून अनाथांना आधार दिला त्याची माता झाली. त्यानंतर त्याचे जीवन अनाथांच्या उधारासाठी घालवते शासनाने त्याच्या कार्याची दखल घेऊन पद्मश्री पुरस्काराने गौरव केला.
आई गेलात तरी तुमचे काम अमर आहे. अनाथाची माय म्हणून तुमचा आधार आहे. आज महिला दिन म्हणून त्या आईचा विचार सांगावसं वाटतं आज माझ्या आईचा सुद्धा पण जन्मदिवस अवघ्या सोडाव्या वर्षात अंगणवाडी सेविका म्हणून आजपर्यंत कार्यरत आहे. हजार जन्म घेतले तरी एका जन्माचे ऋण फिटणार नाही आई- बाबा चुका होतील मजकडून तुझं समजावणं मिटणार नाही.
अंकुश मोरेश्वर मनबत्तुलवार उपरी तालुका सावली जिल्हा चंद्रपूर.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

December 2024
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!