*सावली पोलिस स्टेशन तर्फे होळी आणि धुलीवंदन सणानिमित्त विशेष मोहीम*
प्रतिनिधी
पोलिस स्टेशन सावली अंतर्गत होळी व धूलीवंदन सणाकरिता दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात येत असून सदर मोहिमेकरता तालुक्यात विशेष पथक तयार करण्यात आलेले आहेत.तसेच विविध मार्गावर अचानक नाकाबंदी व तपासणी करण्यात येणार आहे.
होळी आणि धुलीवंदन सणाचा आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रपरिवार यांचेसोबत आनंद घ्यावा.आणि कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची खबरदारी तालुक्यातील जनतेनी घ्यावी असे आवाहन सावली पोलिस स्टेशन चे ठाणेदार आशिष बोरकर यांनी जनतेस केले आहे. सदर सण शांततेत व अपघात मुक्त पार पाडण्यासाठी पोलीस स्टेशन सावलीचे विशेष पोलीस पथक करण्यात आले आहे.



