जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीचे संकेतस्थळ गत महिना भरापासून बंद!
जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीचे संकेतस्थळ महिनाभरापासून बंद कसे काय राहू शकते? माणसाला एकीकडे शासनाने योजना आणि सवलती जाहीर केल्या आणि त्याच्या पूर्ततेसाठी नियुक्त केलेल्या एजन्सीच्या अकार्यक्षमतेचा फटका सर्वसामान्य जनतेला बसून त्यांना कशाप्रकारे नानाविध समस्यांना सामोरे जावे लागते याची एक वास्तव कथा मांडण्याची आज गरज भासते आहे कां? राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीचे संकेतस्थळ जवळपास गत महिनाभरापासून बंद आहे. त्यामुळे अनुसूचित जाती, ओबीसी, व्हीजेएनटी, मराठा,एसबीसी प्रवर्गातील उमेदवारांना‘कास्ट व्हॅलिडिटी’साठी भटकंती करावी लागत आहे. चांद्यापासून तर बांद्यापर्यंत हीच स्थिती असताना राज्य सरकारचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे वास्तव आहे.‘कास्ट व्हॅलिडिटी’संबंधित अर्ज स्वीकारणे, पोचपावती देणे, त्रुटींची पूर्तता करणे, जातवैधता प्रमाणपत्र ऑनलाइन देणे ही कामे पुणे येथील(एका एजन्सीकडे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने सोपविली आहेत. विद्यार्थी, नागरिक वा राजकीय व्यक्तींना ‘कास्टव्हॅलिडिटी’ मिळविणे सुकर व्हावे,
यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला .मात्र, महिनाभरापासून ‘कास्ट व्हॅलिडिटी’चे संकेतस्थळ बंद असताना पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (बार्टी)कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सामाजिक _ न्यायविभागाच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी* विभागात उमेदवार आणि पालक येरझारा मारून थकून गेले आहेत. या प्रकरणात ऑनलाइन कामकाज बंद असताना ऑफलाइनची सुविधा नाही, हे विशेष.जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवने नवे नाही. पण, आता तुमचा हा त्रास वचणार आहे. रक्ताच्या नात्यातील कोणत्याही एका व्यक्तिकडे असलेले जात प्रमाणपत्र यासाठी पुरे असणार आहे. असेही ही साईटच (संकेतस्थळ)दाखवते आहे आणि तरीही……असे हेलपाटे कां मारावे लागताहेत यामुळे विद्यार्थ्यांसोबत पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.



