अंगणवाडीमध्ये जंबो भरती
30 हजार अंगणवाडी सेविका, मदतनीसची जागेसाठी अर्ज सादर आमंत्रित
अंगणवाडी सेविकाच्या मानधनात 1500/- रूपयांनी वाढ
महाराष्ट्रातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एक लाख दहा हजार अंगणवाड्यांमध्ये ३० हजारांहून अधिक मदतनीस व सेविकांची भरती सध्या सुरु आहे. सुरवातीला पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केली जात असून एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत सुरु असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची रिक्त पद भरतीचा तिढा सुटला असून आज १ मार्च पासून इच्छुकाकडून अर्ज स्थानिक रहिवाशाकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत.
अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे प्रश्न वर्षोनुवर्षे पासून कायम असल्याचे चित्र आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे आहे, त्या सेविका व मदतनिसांवर कामाचा ताण येत आहे. आपले काम पाहून शेजारच्या अंगणवाडीची जबाबदारी सांभाळण्याची वेळ अनेकांवर येत असल्याने साहजिकच विस्कळितपणा वाढत असल्याचे दिसते. यामुळे रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती.
तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बालकल्याण समितीच्या कार्यालया मार्फत वरील अर्ज मागविण्यात येणार आहेत . पंधरा दिवसांत सर्व कागदपत्रांसह ( शैक्षणिक पात्रतेसह इतर ) अर्ज त्याच ठिकाणी आणून सादर करावे लागणार आहेत . त्यानंतर बालकल्याण अधिकारी अर्जांची तपासणी करतील आणि त्यानंतर प्राधान्य नुसार यादी प्रसिध्द होईल . जवळील तालुक्यातील बालकल्याण अधिकारी त्या यादीची तपासण करतील . निवड झालेल्या उम्मेद्वाराच्या नावांवर आक्षेप घेण्यासाठी काही दिवसांचा कालावधी देखील दिला जाणार आहे . त्यानंतर अंतिम निवड यादी ( Anganwadi Bharti List ) प्रसिध्द केली जाणार आहे .
सावली तालुक्यात अंगणवाडी सेविकांची एकुण पदे 3 व मदतनीसांची एकूण 18 पदे रिक्त आहे. यामध्ये भारपायली, राजोली फाल, हिरापुर क्र. 1 येथे अंगणवाडी सेविका पद व मदतनीस पद अंगणवाडी केंद्र जांब बुज, बोथली क्र.3, केरोडा क्र 2, सावली क्र 5, सावली क्र.9, भट्टीजांभ, लोंढोली क्र. 1, पांडरसराड, साखरी क्र 2, करगावं, निलसनी पेटगावं क्र 1, मेहा बूज क्र 1, व्याहाड बूज क्र 2, पाथरी क्र 5, विरखल क्र 2, गेवरा बूज क्र. 2, निफंद्रा क्र. 3 रुद्रापुर इत्यादी केंद्राचा समावेश आहे.
अंगणवाडी मदतनीस या पदाच्या नियुक्तीसाठी इच्छुक उमेदवार हा किमान १२ वी उत्तीर्ण आवश्यक आहे. वयाची अट १८ ते ३५ वर्ष असून विधवा साठी वयाची अट ही मात्र ४० वर्षे ठेवण्यात आली आहे. या रिक्त पदासाठी आज १ मार्च पासून १५ मार्च पर्यंत इच्छुक महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवाराची अर्ज एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय सावली येथे सुट्टीचा दिवस वगळून स्विकारले जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 1500 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे



