आजपासून मोफत RTE 25 टक्के साठी ऑनलाईन फॉर्म भरणे सूरू

मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम RTE 25 टक्के फार्म भरणे सूरू
दरवर्षी प्रमाणे सन २०२३-२४ या वर्षाची बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (सी) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयमअर्थसाहित शाळा, खाजगी विना अनुदानित व खाजगी कायम विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत आहे. शासनाने संदर्भ क्र.3, 7 व 8 सुचना विचारात घेऊन सन २०२३-२४ या वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रकियेबाबत संचालनालयाचे संदर्भ क्र.9 च्या पत्रांन्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.प्रवेश प्रक्रिये अंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. सबब, बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागिवणेची प्रक्रिया दिनांक .01/03/2023 दुपारी 03:00 ते दि.. 17/03/2023 रात्री 12:00 वाजेपयȊत सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आपण आरटीई 25 टक्के प्रक्रिये अंतर्गत पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आव्हाहन करण्यात येत आहे.