रमाबाई आंबेडकर विद्यालयाचे सहा. शिक्षक पी. एस. वरारकर यांचा स्वेच्छानिवृत्ती कार्यक्रम संपन्न
*रमाबाई आंबेडकर विद्यालयाचे सहा. शिक्षक पी. एस. वरारकर यांचा स्वेच्छानिवृत्ती कार्यक्रम संपन्न*
सावली 🙁 तालुका प्रतीनिधी) चंद्रशेखर प्यारमवार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती शिक्षण प्रसारक संस्था , सावली द्वारा संचालित रमाबाई आंबेडकर विद्यालयात गेल्या २८ वर्षांपासून कार्यरत असलेले सहा. शिक्षक श्री. पी. एस. वरारकर सर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने त्यांचा निरोप समारंभ मंगळवार दि. २८/२/२०२३ ला विद्यालयात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष श्री. के. एन. बोरकर साहेब होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थासचिव प्रा. सौ. व्हि. सी. गेडाम मॅडम , संचालिका सौ. सी. आर. गेडाम , संचालक व्हि. के. बोरकर , संचालक यू. एम. गेडाम , पर्यवेक्षक लाकडे सर उपस्थित होते. श्री. पी. एस. वरारकर सर हे मनमिळाऊ व विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. ते गणित व विज्ञान विषयाचे शिक्षक होते. वडिलांच्या वृध्दापकाळात त्यांची सेवा करण्यासाठी ते स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत हे विशेष. निरोप समारंभ प्रसंगी त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कस्तुरे सर यांनी केले तर आभार सौ. मेटांगडे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



