Vidarbh24News

Latest Online Breaking News

*तालुक्यातील प्रगतशील शेतकरी वामन.बोरकुटे विविध पुरस्काराने सन्मानित*

“धानपिकासह विविध पिकांची लागवड करून घेतात विक्रमी उत्पादन””

सेंद्रिय शेतीचा वापर”

*सावली*(बाबा मेश्राम)- तालुका मुख्यालयापासुन जवळच असलेल्या रुद्रापुर येथील वामन श्रीराम बोरकुटे या प्रगतशील शेतक-याला विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे,यात शेतकरी पुरस्कार,उन्नत शेतकरी पुरस्कार आदींचा समावेश आहे.
रुद्रापुर येथील रहिवासी असलेले शेतकरी वामन बोरकुटे यांची स्व मालकीची ६एकर शेती आहे,नैसर्गिक खतांचा वापर जसे,कंपोस्ट खत,पालापाचोळा याचा वापर. आपल्या शेतीत करतात,धानपिकात पट्टा पध्दत,श्री पध्दत चा वापर.करून विक्रमी उत्पादन घेतात,७ वर्षांपासून सदर पध्दतीचा वापर करीत आहेत, यासोबत मिरची, वांगी, टमाटर आदी भाजीपाला पिकांची बारमाही लागवड करत असतात,
भाजीपाला, धानपिकांसाठी पिंकलर सिंचनाचा उपयोग करून पाणीपुरवठा केल्या जातो,सोबतच विहीर सुध्दा त्यांचा शेतात आहे, विविध पिकांच्या फवारणी साठी निंबोळी अर्क,दशपर्णी अर्क आदींचा उपयोग केल्या जातो.


वामन बोरकुटे यांनी जिल्हा परिषद तर्फे शेतकरी पुरस्कार देऊन.गौरविण्यात आले,तर २०१७ मध्ये राष्टपिता महात्मा गांधी महाविद्यालय तर्फे तालुक्यातील उत्कृष्ट शेतकरी तर २०१९मध्ये झालेल्या जिल्हा कृषी महोत्सव मध्ये “प्रगतशिल शेतकरी”पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, बोरकुटे यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत झालेले असुन ३०’/४० मराठी ,इंग्रजी, हिंदी टायपिंग झाले आहे, त्यांना दोन मुले आहेत,दोंन्ही मुले नागपुर येथे इंजीनियरिंग चे शिक्षण घेत आहेत, बोरकुटे यांची आकाशवाणी वर सुध्दा मुलाखत झालेली आहे,त्यांच्या शेतीवरील बांधावर जिल्हा कृषी अधिकारी, तसेच सावली तहसील चे नायब तहसीलदार सागर कांबळे यांनी प्रत्यक्ष भेट दिली आहे,त्यांनी घेतलेल्या शेतीतील मेहनत व उत्पादनाचे कौतुक करण्यात येत आहे….

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!