मराठी भाषा गौरव दिन साजरा ……
मराठी भाषा गौरव दिन साजरा ……
सावली ( लोकमत दुधे )
राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. दिवाकर उराडे , प्रा प्रशांत वासाडे , डॉ. प्रफुल वैराळे , प्रा.महानंदा भाकरे, मराठी विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र वासेकर उपस्थित होते. वासेकर यांनी मराठी भाषेचे महत्व व कविवर्य कुसुमाग्रज यांच्या कवितेची अभिवाचन केले. किशोर बुरकुटे यांनी स्वलिखित कविताा सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. चंदा पिसे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सरिता पोटे हिने केले तर आभार रोहित कोसरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य प्रफुल्ल गेडाम, समीर गेडाम सहकार्य केले …..



