युवा तू जागा हो

*युवा तू जागा हो…*
युवा तू जागा हॊ
सर्वाना सांभाळ
योग्य काम कर
बदलेल काळ
तुच रे आहेस
भविष्य देशाचा
शिक आणि लढ
लढा संघर्षाचा
भ्रष्टाचार सुरु
आहे या देशात
लढण्यासाठी तू
कर सुरुवात
देशाचा बचाव
तूझ्या रे हातात
कर विचार तू
आपल्या डोक्यात
तूच रे आधार
ठेव जरा भान
जागा होऊन तू
कर काम छान
जागा होऊन तू
थांबव हे सर्व
देशात तुझाच
राहील रे गर्व
*कवी:*
*अजय द. राऊत*