अखेर तो बिबट जेरबंद
आज दिनांक 26.02.2023 रोजी ब्रम्हपुरी वनविभागीतील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र – सिंदेवाही, नियतक्षेत्र – सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या मौजा कोठा (मुरमाडी) येथिल श्री. अंबादास चिरकुटा श्रीरामे यांचे जुन्या पडक्या घरी बिबट (मादी) दडून असल्याची माहिती प्राप्त झाल्यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी, सिंदेवाही (प्रादे) यांनी अधिनिस्त कर्मचारी व अतिशिघ्र दल सिंदेवाही (RRU) यांचेसह घटनास्थळ गाठले.
त्याअनुषंगाने बिबट (मादी) ला जेरबंद करण्यासाठी सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील अधिनिस्त कर्मचारी व RRU चमु सिंदेवाही यांनी शर्तीचे प्रयत्न करून सदर बिबट (मादी) ला त्या घरातील एका रूम मध्ये बंद करण्यात यशस्वी झाले. वरीष्ठ अधिकरी यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली सदर बिबट (मादी) ला जेरबंद करण्यासाठी डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) RRT ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर, यांना पाचारण करण्यात आले. व पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) RRT ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनात अजय मराठे, सशस्त्र पोलिस दल यांनी सदर बिबट (मादी) अचुक निशाना साधून दुपारी 3.10 वाजता डार्ट केला व सदर बिबट (मादी) बेशुध्द झाल्यानंतर त्यास दुपारी 3.25 वाजता पिंज-यात सुरक्षितरित्या बंदीस्त केले. वरील संपुर्ण कार्यवाही RRT ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर चे कर्मचारी श्री. अतुल मोहुर्ले, वनरक्षक, श्री. भोजराज दांडेकर, वनरक्षक श्री. अमोल तिखट वनरक्षक, श्री. सुनिल नन्नावरे, वनरक्षक श्री. अमोल कोरपे, वाहन चालक, श्री. अक्षय दांडेकर वाहन चालक, तसेच सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील श्री. विशाल सालकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, सिंदेवाही, श्री. डी. के. हटवार, क्षेत्र सहायक, सिंदेवाही, श्री. एस. बि. उसेंडी, क्षेत्र सहायक, नवरगांव, श्री. डी. के. मसराम, वनपाल RRU सिंदेवाही, श्री. स्वप्नील बडवाईक, वनरक्षक, श्री. सचिन चौधरी, वनरक्षक श्री. विनोद चिकराम, वनरक्षक, श्री. नितेश शहारे, वनरक्षक, श्री. जितेंद्र वैद्य, वनरक्षक, श्री रवि मारभते श्री. कमलाकर बोरकुंडवार, श्री. दिपक बालुगवार वाहन चालक यांनी केली.
सदर कार्यवाही पार पाडतांना पोलिस स्टेशन सिंदेवाही चे स.पो.नि. तुषार चव्हान, पो.उप.नि. सागर महल्ले व त्यांचे कर्मचारी यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे कार्य पार पाडले.
जेरबंद केलेला बिबट (मादी) वय अंदाजे 10-12 महीने असून तिला पुढील उपचार व देखभाल करीता ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटर, ( TTC) चंदपुर येथे स्थलांतरीत करण्यात येईल.