कविता: पळस फुलला ताजा
*पळस फुलला ताजा*
आला आला वसंत ऋतूराज
पळस आलाय निसर्गी फुलून
केशरी पांढऱ्या रंगात फुलला
झाडांवर फुले दिसती शोभून
निसर्गाची खरी किमया सारी
पळस फुले गर्द केशरी रंग
मनाला पाडतो भुरळ बघा
वाट खुलली हिरवाईच्या संग
बघून हिरवाईत केशर रंग
उठून दिसतो छान पळस
निष्पर्ण झालेल्या वृक्षाला
जणू चढवला केशरी कळस
फाल्गुन महिन्याचा पाडवा
छान पळस फुलला ताजा
धुलीवंदनाला रंग वापरून
वाजवू आनंदाचा बोलबाजा
बघा पळस फुलला ताजा
आयुर्वेदिक औषधासाठी
निसर्गही हसतो हळूवार
मानव जनाच्या सुखासाठी
*कावियित्री: हर्षा भुरे, भंडारा*