संगणक परिचालक महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने मृतक नितेश गुरनूलेच्या परिवाराला आर्थीक मदत
सावली(प्रतिनिधी)
संगणक परिचालक असलेला चकपिरंजी ग्रामपंचायत येथे कार्यरत नितेश गुरुनुले यांचे ५ फेब्रुवारीला दीर्घ आजाराने निधन झाले.नितेशची घरची परिस्थिती बेताची असल्याने व त्याला दोन लहन- लहान मुले असल्याने त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी आज दिनांक २५ फेब्रुवारी रोज शनिवारला चकपिरंजी येथे जाऊन स्वर्गीय नितेश गुरुनुले यांच्या पत्नी विश्रांती नितेश गुरुनुले यांना संगणक परिचालक संघटना महाराष्ट्र राज्य यांचेकडून आर्थिक मदत म्हणून धनादेश देण्यात आला.
याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाल, जिल्हा सचिव मोना धोटे ,बल्लारपूर तालुका अध्यक्ष संजय, सावली तालुका अध्यक्ष निलेश पुटकमवार ,उपाध्यक्ष राकेश मुळे, सचिव प्रशांत घोडे, नितीन डोंगरे, प्रमोद चौधरी, प्रशांत मलोडे, मुरलीधर देशमुख, निखिल चापले, मुकेश भुरसे, मुकेश डोईजळ, नेताजी भोयर, रवी पासकंटीवर, किरण वाढणकर, लाकडे बंधू,, आशुतोष सिडाम, दिपक नळे, संघरत्न निमगडे, जागेश्वर रामटेके, पुणाजी कोटरंगे बहूसंख्य संगणक परिचालक उपस्थित होते.