राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्ताने स्वच्छतादूत प्रशांत तावाडे यांच्याकडून फळ व बिस्किटे वाटप
स्थानीक सावली येथील प्रसिद्ध स्वच्छतादूत व समाजसेवक हे नेहमी समाजपयोगी व लोकहिताचे कामे करीत असतात.आज त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा दिसून आला.प्रत्येक युवकाने त्यांचे आदर्श घ्यावे अशे त्यांचे व्यक्तिमत्व आहे.
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंती व प्रशांत गाडेवार सर यांच्या अभिष्टचिंतन सोहळा या संयुक्त निमित्ताने ग्रामीण रुग्णालय सावली येथे स्वच्छतादूत प्रशांत तावाडे यांच्याकडून जवळपास ७०-८० रुग्ण व त्यांच्या नातेवायिकांना फळ व बिस्किटे वाटप करण्यात आले.
या वेळी ग्रामीण रुग्णालय सावलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विलास वाघधरे, डॉ.सुरेश कांदे व परिचारिका ममता कुमरे, पल्लवी दुधे तसेच सावली तालुका काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभाग अध्यक्ष कमलेश गेडाम व बादल गेडाम, यश गेडाम, अर्जित डोंगरे, प्रतिक दुधे,कुणाल गेडाम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



