भिमणी येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पोंभूर्णा तालुक्यातील भिमनी येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमासह मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
रविवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण गावात ग्राम स्वच्छता अभियान राबवून कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर शिवाजी चौकातून ढोल ताशे, आणि हलगीच्या वातावरणात भगवे हातात घेऊन उत्साहात रॅली काढून गावाला जणू हिंदवी स्वराज्याचे प्रतिक असलेल्या भगव्या रंगाने व्यापून टाकले. दु. 2.00 वा. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायं.4.00 वा. पोंभूर्णा पंचायत समितीच्या माजी सभापती कु. अल्काताई आत्राम , माजी उपसभापती विनोदभाऊ देशमुख, भिमणी येथील सरपंचा सौ. पल्लवीताई चहाकाटे, उपसरपंच श्री.रणजित पिंपळशेंडे, यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली.

यावेळी मंचावर श्री. प्रकाश काळे सर, रमेश काळे सर, मुक्तेश्वर ईटकलवार सदस्य ग्रा.पं.भिमणी, संतोष गेडाम सदस्य ग्रा. पं. भिमणी, ज्योतीताई फरकडे सदस्या ग्रा. पं. भिमणी, चंद्रहास गिरसावळे पो.पा.भिमणी, जानकीराम ईटकलवार तंटामुक्ती अध्यक्ष भिमणी,सुभाष पा. काळे, आनंदराव पा. काळे, संदीपभाऊ ईटकलवार, स्वप्निल काळे,यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.



