विश्व शांती विद्यालयात शिव जयंती साजरी

भारत शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी रयतेचे राजे, स्वराज्याचे निर्माते,छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक अरुण राऊत, सहाय्यक शिक्षक किशोर संगिडवार,प्रवीण काटपल्लीवार, राहुल आदे,धनंजय गुरनुले उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या संचालन सहाय्यक शिक्षक प्रदीप कोहळे यांनी केले तर आभार शेखर प्यारमवार यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.