सावली शहरांत कुत्र्यांचा आणि जनावरांचा हैदोस

अनेकांना कुत्र्याचा चावा आणि रस्त्यांवरील जनावरांमुळे जीव गमवावे लागले
नगर पंचायत माजी राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या आदेशाकडे लक्ष देइल काय?.
सावली शहरांत अनेक लावारिस कुत्रे आहेत. या महिन्यात दोन लोकांना चावा घेतला. यामध्ये वसंत पुरुषोत्तम टापरें शिक्षक, सात वर्षाचा अंशुल प्रविण दुर्गे या छोट्याशा बालकाला सात ठिकाणीं चावा घेऊन गंभिर जखमी केले. त्याला गडचिरोलीला सामान्य रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले.
सहा- सात वर्षांपुर्वी नयन विठ्ठल गोरडवार या आठ वर्षांच्या मुलाला असाच कुत्रा चावल्याने जीव गमवावा लागला.
आठ दिवसापूर्वी बैलांच्या झुंडीत घोडेवाही येथील संदेश बालाजी शेंडे नामक तरुणाला सावली नाक्याजवळ मृत्यू झाला. असे अनेक घटना शहरांत घडत आहेत. मात्र नगर पंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहे.
काल सावली तालुका काँगेस कमिटीत झालेल्या पत्राकर परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर नगर पंचायतला कुत्र्यांचा आणि जनावरांचा चोख बंदोबस्त करण्याचे आदेश राज्याचे माजी मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिले मात्र नगर पंचायत यावर कोणती ठोस कार्यवाही करते की माजी मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवते याकडे सावली वासियांचे लक्ष लागले आहे.